पुणेकरांना भोपळाच दिला;अंदाजपत्रकातून पुरंदर विमानतळ वगळणे धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 10:25 IST2025-03-13T10:24:01+5:302025-03-13T10:25:04+5:30

एकूणच पुणेकरांची भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने अंदाजपत्रकातून मात्रआहे, अशी टीका माजी आमदार जोशी यांनी केली.

Pune were given only pumpkin Exclusion of Purandar Airport from the budget is shocking | पुणेकरांना भोपळाच दिला;अंदाजपत्रकातून पुरंदर विमानतळ वगळणे धक्कादायक

पुणेकरांना भोपळाच दिला;अंदाजपत्रकातून पुरंदर विमानतळ वगळणे धक्कादायक

पुणे : पुरंदर विमानतळाबाबत वारंवार घोषणा करणाऱ्या सरकारने अंदाजपत्रकात त्यासाठी पैशाचीही तरतूद केलेली नाही. दहा वर्षांचा वायदा करून पुणे मेट्रोसाठी केलेली तरतूदही पोकळच आहे. एकूणच पुणेकरांची भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने अंदाजपत्रकातून मात्रआहे, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

पुणे जिल्ह्याचे अजित पवारच उपमुखमंत्री, अर्थमंत्री आहे. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री, माधुरी मिसाळ राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री, भाजपला पुणेकरांनी भरभरून मते दिली व त्यातूनच यांना ही मंत्रिपदाची संधी मिळाली. आता पुणेकरांना काही देण्याची वेळ त्यांची होती, मात्र त्यांनी भोपळाच हाती दिला आहे, असे जोशी म्हणाले.

विमानतळ, त्यासाठीचे भूसंपादन वगळणे धक्कादायक आहे. सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी २ हजार गाड्या घेण्यासाठी तरतूद नाही, आंबेगावमधील शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली, आता सरकारने त्या शिवसृष्टीच्या संयोजकांना सर्वसामान्य पुणेकरांना जाता येईल इतके प्रवेश शुल्क ठेवण्यासाठी सांगावे, प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी त्यांनी तब्बल ६०० रुपये शुल्क ठेवले आहे याची सरकारला माहिती आहे का, असा प्रश्न जोशी यांनी केला.

Web Title: Pune were given only pumpkin Exclusion of Purandar Airport from the budget is shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.