Pune: चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा खून; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 10:14 PM2024-07-23T22:14:08+5:302024-07-23T22:15:45+5:30
Pune Crime News: ४४ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा फोन केला. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बुर्केगाव परिसरात ही घटना घडली. भर दिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले.
- किरण शिंदे
४४ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा खून केला. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बुर्केगाव परिसरात ही घटना घडली. भर दिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले.
लक्ष्मीबाई बाबा जाधवराव (वय ४४, बुर्केगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, पती बाबा जाधवराव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्केगावात जाधव कुटुंबीय राहण्यासाठी आहे. आरोपी बाबाराव जाधव यांना दारूचे व्यसन आहे. दारू पिऊन ते पत्नीशी वाद घालत होते. दरम्यान, लक्ष्मीबाई या एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. तर, बाबाराव जाधव हा वेल्डींगची कामे करत होता. दरम्यान बाबाराव हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्यांच्या सतत भांडण व्हायचे. सोमवारी मध्यरात्री देखील याच कारणावरून भांडण झाले. मध्यरात्री बाबा हा दारू पिऊन आला होता. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर ते एकत्र झोपलेही. दरम्यान, मध्यरात्री बाबा याने पत्नी लक्ष्मीबाई यांचा कुऱ्हाडीने वार करत खून केला.
पत्नीचा खून केल्यानंतर बाबा तिथेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी आई फोन उचलत नसल्याने त्यांची मुलगी घरी आली. घराचा दरवाजा बंद असल्याने दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला असता लक्ष्मीबाई या रक्ताच्या चारोळ्या पडल्याचे दिसून आले. तर शेजारीच बाबाराव जाधव झोपला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. लोणीकंद पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपी बाबाराव याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.