‘थेस्पो’महोत्सवात पुण्याची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:12+5:302020-12-24T04:11:12+5:30
पुणे : ‘थेस्पो’ या देशातील पहिल्या डिजिटल फेस्टिव्हलमध्ये पुण्यातील कलाकारांनी बाजी मारली. अभिनय, लेखन, प्रॉडक्शन डिझाईन आणि शो ...
पुणे : ‘थेस्पो’ या देशातील पहिल्या डिजिटल फेस्टिव्हलमध्ये पुण्यातील कलाकारांनी बाजी मारली. अभिनय, लेखन, प्रॉडक्शन डिझाईन आणि शो मँनेजमेंट अशा विविध पारितोषिकांवर आपले नाव कोरले.
जयपूर, कलकत्ता आणि पुण्यामधील कलाकारांच्या सहभागामुळे हा महोत्सव यशस्वी ठरला. महोत्सवात ‘मैं बिडी पिकर झूट नहीं बोलता’, ‘मियॉंह-बॉय डायरीज’,‘नाईटमेअर’ आणि ‘द लाईट कँचर डिफाईड’ असे चार नाटकांचे सादरीकरण झाले. यातील ‘नाईटमेअर’ या नाटकाचे एरंडवणे येथील ’द बॉक्स’ या नवीन फॉर्ममधील नाट्यगृहात सादरीकरण झाले. यामध्ये अलीक पदमसी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार अनुक्रमे अतीफ अली डँगमन (मियॉंह-बॉय डायरीज, कलकत्ता) व रितिका श्रोत्री (द लाईट कँचर, पुणे) यांना मिळाला. नील देशपांडे (नाईटमेअर, पुणे) आणि सुनील सायनी (मैं बिडी पिकर झूट नहीं बोलता) यांनी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. ‘नाईटमेअर’ला उत्कृष्ट संकलन तर उत्कृष्ट शो व्यवस्थापनासाठी ’द लाईट कँचर’ ला पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट नवोदित लेखनासाठी अतीफ अली डँगमन (मियॉंह-बॉय डायरीज, कलकत्ता) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाकरिता रितिका श्रोत्री (नाईटमेअर) पुरस्कार मिळाला. गुवाहाटी विद्यापीठाच्या नाट्य आणि इंग्रजी साहित्य अभ्यासक आशा कुठारी चौधरी, प्रसिद्ध अभिनेत्री सुषमा देशपांडे आणि कलात्मक दिग्दर्शक विनय शर्मा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.