Pune: महिलेला 'इव्हिनिंग वॉक'पडला महागात, अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवत उतरविले कपडे, दागिन्यांची केली लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 09:47 PM2024-07-27T21:47:35+5:302024-07-27T21:47:53+5:30
Pune Crime News: बारामती शहरातील भिगवण रस्त्यालगत राहणाऱया एका ३० वर्षीय महिलेला 'इव्हीनिंग वॉक' चांगलाच महागात पडला आहॆ .शहरातील एमआयडीसी परिसरात पालखी मार्ग चौकात हि महिला सायंकाळी फिरण्यास गेली होती.यावेळी या महिलेला चाकूचा धाक दाखवत अर्धनग्न करीत दागिन्यांची लूट करण्यात आली.
बारामती - बारामती शहरातील भिगवण रस्त्यालगत राहणाऱया एका ३० वर्षीय महिलेला 'इव्हीनिंग वॉक' चांगलाच महागात पडला आहॆ .शहरातील एमआयडीसी परिसरात पालखी मार्ग चौकात हि महिला सायंकाळी फिरण्यास गेली होती.यावेळी या महिलेला चाकूचा धाक दाखवत अर्धनग्न करीत दागिन्यांची लूट करण्यात आली.२४जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणी तिघा अज्ञातांविरोधात विनयभंगासह जबरी चोरी व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय विवाहित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहॆ .त्यानुसार दि. २४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालखी मार्ग चौकात चौकातील उड्डाणपुलाजवळ ती तासभर वाॅक करत होती. त्यावेळी डिव्हायडरजवळ एक व्यक्ति फोनवर बोलत होती. त्यानंतर लघुशंकेसाठी ही महिला एका ऊसाच्या पिकात गेली. त्यावेळी अनोळखी एक व्यक्ति तिच्या मागे तेथे आला. त्याने चाकू काढत तिच्या गळ्याला लावला.तसेच गळ्यातील काढ, अशी धमकी दिली. त्याला घाबरून तिने थांब काढून देते, असे सांगितले. तेवढ्यात आणखी दोन अनोळखी तरुण तेथे आले. त्यातील एकाने तिचे तोंड दाबून धरत तिचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तिला तेथून थोड्या अंतरावरील विहिरीच्या कडेला असलेल्या ऊसाच्या पिकात नेले. तेथे चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील टाॅप्स, सोन्याची अंगठी असे १ लाख ५ हजारांचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
चाकू हातात असलेल्या युवकाने तिला कपडे काढण्यास सांगितले. तिने नकार दिला असता त्यांनी तिची अोढणी काढून बाजूला फेकून दिली. तिच्या अंगावरील टाॅप फाडून काढला. तिच्या अंगातील लेगीज पॅण्ट जबदस्तीने काढून फेकून दिली. त्यातील एकाने तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढत तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्यातील एकाने या मोबाईलमुळे पुढे कुटाना होईल असे म्हणत तिचा मोबाईल तेथेच फेकून देत ते तेथून निघून गेले. २५ ते ३२ या वयोगटातील हे तिघे तरुण होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.