२५ दिवसात सायकल वरून पुणे ते पुणे व्हाया दिल्ली चेन्नई कोलकत्ता ! ६००० किमी प्रवास करत पुण्यातील महिलेचे वर्ल्ड रेकॉर्ड.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 09:27 PM2021-03-23T21:27:51+5:302021-03-23T21:30:24+5:30
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पुण्यातील एका ४३ वर्षीय महिलेने चक्क सायकल वरून भारत भ्रमण केले आहे. प्रीती म्हस्के असा या महिलेचे नाव असून ६००० किलोमीटर चे सायकलिंग करून त्या आज पुण्यात परत आल्या. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रीती म्हस्के यांचा हा प्रवास सुरु झाला २७ फेब्रुवारी रोजी. शनिवारवाड्यावरून त्यांचा या प्रवासाला सुरुवात झाली. एका महिन्याचा आत हा प्रवास पूर्ण करत त्या पुण्यात परत आल्या आहेत. अर्थात तब्बल ६ हजार किलोमीटर चा हा टप्पा पार करणे त्यांच्यासाठी देखील सोपे नव्हते. सुरुवातीची प्रॅक्टिस आणि दररोज किती अंतर पार करायचे याचे नियोजन असे करत प्रीती यांनी हा संपूर्ण प्रवास पूर्ण केला. अर्थातच यात बदलणारे वातावरण हे सर्व चॅलेंज त्यांचासमोर होते. मात्र दररोज नियोजनाप्रमाणेच प्रवास करत त्यांनी ना चुकता फेसबुक चा माध्यमातून अपडेट्स देणे देखील सुरु ठेवले होते.
मुंबई दिल्ली चेन्नई कोलकत्ता असा सुवर्ण चतुर्भुज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चा प्रवास प्रीती म्हस्के यांनी केला आहे आणि त्या भारतातील हा टप्पा सर्वात वेगात पार करण्याऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. विशेष म्हणजे ४३ वर्षांचा प्रीती यांना खेळाची आवड असली तरी व्यवसाय आणि कुटुंबाची जबाबदारी यामुळे त्यांची खेळाची सवय मागे पडली होती. २०१७ मध्ये मात्र त्यांनी पुन्हा धावणे आणि सायकलिंग करायला सुरुवात केली. या पूर्वी देखील त्यांनी भारताचा वेगवेगळ्या भागात असाच प्रवास केला आहे.
याविषयी बोलताना म्हस्के म्हणाल्या "कोणीही हे करू शकता. सध्या जेवण , नियमित व्यायाम आणि ध्येयाकडे लक्ष देणे यातून मी हे करू शकले."