'प्ले बॉय'च्या नादापायी 'खेळ खल्लास'; तासाला ३ हजार कमावण्याच्या मोहात गमावले १७ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 12:32 PM2022-04-07T12:32:54+5:302022-04-07T13:52:57+5:30

फसवणूक झाल्याचे कळताच तरुणाची पोलिसांत तक्रार...

pune youth loses 17 lakh in temptation to become play boy crime news in pune city | 'प्ले बॉय'च्या नादापायी 'खेळ खल्लास'; तासाला ३ हजार कमावण्याच्या मोहात गमावले १७ लाख

'प्ले बॉय'च्या नादापायी 'खेळ खल्लास'; तासाला ३ हजार कमावण्याच्या मोहात गमावले १७ लाख

googlenewsNext

पुणे : पुणे शहरात एका तरुणाने प्ले बॉय होण्याच्या नादात लाखो रुपये गमावले आहेत. या तरुणाला फेसबुकवर प्लेबॉय कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन काढून देतो असं खोटं सांगण्यात आले होते. तासाला ३००० रुपये कमावता येतील हे ऐकताच त्याने फोन पे मार्फत वेगवेगळ्या अकाउंट वर १७ लाख रुपये पाठवले. 

त्यानंतर मात्र काही पैसे मिळाले नसल्याचे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे कळताच तरुणाने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. हा सर्व प्रकार दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

शहरात अशा फसवणूकींच्या घटनांत मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरातील सायबर पोलिसांनी यापूर्वी असे अनेक फसवणूकीचे प्रकार उघडकीस आणले आहेत. 

तरुणांना वेगवेगळे प्रलोभने दाखवून अशा फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. अननोन नंबरवरून फोन करून मुली बोलून तरूणांना भाळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच तरूण अशा प्रकरणांत अडकून बळी ठरतात

Web Title: pune youth loses 17 lakh in temptation to become play boy crime news in pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.