विधिमंडळ अधिवेशनात पुणे शून्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:12 AM2021-03-14T04:12:04+5:302021-03-14T04:12:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विधानमंडळाच्या अधिवेशनात पुणे शहराचे काहीच प्रतिबिंब पडले नाही, ना कोणत्या विषयावर चर्चा झाली, ना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विधानमंडळाच्या अधिवेशनात पुणे शहराचे काहीच प्रतिबिंब पडले नाही, ना कोणत्या विषयावर चर्चा झाली, ना कोणता विषय मार्गी लागला, अशी टीका आम आदमी पार्टीने (आप) केली.
शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, अधिवेशनाच्या आधी पुण्यातील सत्ताधारी २ व विरोधातील भारतीय जनता पार्टीच्या ६ अशा ८ आमदारांना वाढीव वीजबिल व पुणे शहराच्या अन्य प्रश्नांच्या संदर्भात पत्र पाठविले होते. त्यांनी अधिवेशनात हे विषय उपस्थित करावेत, अशी अपेक्षा त्यात व्यक्त केली होती. एकाही आमदारांनी या पत्राला साधी पोहोचही दिली नाही.
राजकीय पक्ष म्हणून नाही, तर शहराचा नागरिक म्हणून हे पत्र पाठविले होते. त्याला प्रतिसाद मिळाला नाही, पण अधिवेशनात त्यांच्याकडून शहराच्या किमान काही प्रश्नांवर विचारणा होईल, असे वाटत होते. पाणीवाटपाचा प्रश्न येत्या काही दिवसांतच जटिल होणार आहे. त्यावरही काही झाले नाही. वाढीव वीजबिलांवर अधिवेशनात कोणी बोलले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पुण्यातून निवडून आलेले तरीही शहराचे प्रश्न उपेक्षित असतील, तर ते अयोग्य असल्याचे किर्दत म्हणाले.