स्थानिक नागरिकांना प्राधान्याने लस मिळण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रयत्न करणार : शिवतरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:57+5:302021-05-13T04:10:57+5:30
भोर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहु ...
भोर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहु शेलार, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय बामणे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, माजी उपसभापती अमोल पांगारे, तुषार कांबळे ,संतोष भगत, पर्यवेक्षिका प्रतिभा बरबरे यावेळी उपस्थित होते.
शिवतरे म्हणाले कोरोना लस उपलब्ध असताना ती जर नागरिकांना मिळणार नसेल तर ते दुर्दैवी आहे. उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना त्यांना देऊ, ते म्हणाले हॉटस्पॉट गावामध्ये प्रथमता लसीकरण करावे, खासगी दवाखान्यातील कोरोना रुग्णांच्या जास्त येणाऱ्या बिलांवर प्रशासनाने लक्ष ठेवावे असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाबाधित रुग्णांची खासगी दवाखान्यात येणारे बिल तपासण्यासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून यापूर्वी ज्या रुग्णांचे जादा बिल घेतले आहे त्यांना त्या दवाखान्यातून त्यांचे पैसे परत करण्यात आले असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले. ज्या कंपनीत ऑक्सिजन तयार होतो तिथून ऑक्सिजनची चोरी होत असल्याचा मुद्दा माजी उपसभापती अमोल पांगारे यांनी उपस्थित केला. तालुक्यात असणाऱ्या कंपन्याचा सी.एस.आर फंड कोविडसाठी वापरावा तसेच सर्पदंशाची लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपसभापती लहूनाना शेलार यांनी केली. कोरोना काळात कोणत्याही प्रकारची मदत केली जाईल, असे सदस्य रोहन बाठे यांनी सांगितले.
--
चौकट
उत्कृष्ट सेवा करत असलेल्या अंगणवाडी सेविका पुष्पा दिलीप शेटे व अंगणवाडी मदतनीस नंदा अनिल डाळ यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार रुपये पाच हजाराचा धनादेश व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
--
फोटो क्रमांक : १२ भोर लस प्राधान्य
जिल्हास्तरीय अंगणवाडीसेविका व मदतनीस पुरस्कार स्वीकारताना फोटो.