पुणे जिल्हा परिषदेचे विप्रो हाॅस्पिटल दोन दिवसांत शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 09:40 PM2021-04-05T21:40:29+5:302021-04-05T21:40:42+5:30

हिंजवडी येथील विप्रो कोविड हाॅस्पिटलची क्षमता तब्बल 439 बेड्सची असून, सध्या येथे 288 रुग्ण उपचार घेत आहे.

Pune Zilla Parishad's Wipro Hospital will be started at 100 percent capacity in two days | पुणे जिल्हा परिषदेचे विप्रो हाॅस्पिटल दोन दिवसांत शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार 

पुणे जिल्हा परिषदेचे विप्रो हाॅस्पिटल दोन दिवसांत शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार 

googlenewsNext
ठळक मुद्दे तातडीने 5 एमडी व 12 एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती 

पुणे : शहरासोबच ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत हिंजवडी येथील विप्रो कोविड हाॅस्पिटल येत्या दोन दिवसांत शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तातडीने  5 एमडी, 12 एमबीबीएस आणि तब्बल  63 बीएएमएस डॉक्टरांची सर्व पदे भरण्यात आली असून,  आरोग्य कर्मचारीदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हिंजवडी येथील विप्रो कोविड हाॅस्पिटलची क्षमता तब्बल 439 बेड्सची असून, सध्या येथे 288 रुग्ण उपचार घेत आहे. दोन दिवसांमध्ये नवीन स्टाफ रुजू झाल्यानंतर रुग्णालयामध्ये सर्व बेडवर रुग्णांवर उपचार सुरू केली जातील अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील  कोरोना रुग्णांसाठी जिल्हा परिषेदेने हिंजवडीमध्ये रुग्णालय सुरू केले. पहिल्या लाटेत अनेक रुग्णांनी याठिकाणी उपचार घेतले. रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था उपलब्ध असून, दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव लक्षात घेता त्याठिकाणी आवश्यक असलेले मनुष्यबळासाठी कंत्राटी स्वरूपात भरती केली जाणार आहे.

विप्रो रुग्णालयामध्ये सध्या एमडी डाॅक्टर पाच, एमबीबीएस बारा, बीएएमएस 63, नर्स 81 शिवाय आणखी पन्नासपेक्षा अधिक नर्सची भरती केली जाणार असल्याचे शेंडगे यांनी सांगितले. 
------ 

ऑनलाइन कळणार बेड उपलब्धतेची माहिती 
ग्रामीण भागातील सरकारी आणि खासगी रुग्णालये तसेच कोविंड केअर सेंटर आणि कोविंड हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांची संख्या, उपलब्ध बेडची संख्या, तसेच साधे बेडबॅड, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर यांची माहिती आता ऑनलाइन जनतेसाठी उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेने कोविंड  केअर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. येत्या दोन दिवसात प्रत्यक्षात ही यंत्रणा लोकांसाठी उपलब्ध होईल. नागरिकांना ऑनलाईन एका क्लिकवर बेड उपलब्धतेची माहिती मिळू शकेल. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली घुले यांनी ही माहिती दिली. विश्वगुरू इन्फो टीच चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गांगुर्डे यांनी जिल्हा परिषदेसाठी ही प्रणाली विकसित केली आहे.
-----

Web Title: Pune Zilla Parishad's Wipro Hospital will be started at 100 percent capacity in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.