‘पुष्पक’साठी पुणेकर वेटिंगवर, महापालिकेकडे केवळ दोनच गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:45 AM2018-01-31T03:45:39+5:302018-01-31T03:45:47+5:30

तब्बल ४० लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेत शव वाहण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून केवळ दोनच पुष्पक गाड्या असून, तब्बल ८ ते १० तास वेटिंगवर थांबावे लागते. पुष्पक गाड्यांसाठी नागरिकांना वेटिंगवर राहावे लागत असताना तरतूद असताना खरेदीसाठी एक वर्ष विलंब लावल्याने मुख्य सभेत सदस्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

 On Puneer waiting for 'Pushpak', only two trains have been left to the municipal corporation | ‘पुष्पक’साठी पुणेकर वेटिंगवर, महापालिकेकडे केवळ दोनच गाड्या

‘पुष्पक’साठी पुणेकर वेटिंगवर, महापालिकेकडे केवळ दोनच गाड्या

Next

पुणे : तब्बल ४० लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेत शव वाहण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून केवळ दोनच पुष्पक गाड्या असून, तब्बल ८ ते १० तास वेटिंगवर थांबावे लागते. पुष्पक गाड्यांसाठी नागरिकांना वेटिंगवर राहावे लागत असताना तरतूद असताना खरेदीसाठी एक वर्ष विलंब लावल्याने मुख्य सभेत सदस्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. विलंब का झाला, याची चौकशी करून महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पुष्पक वाहन खरेदीसाठी तरतूद केली असताना खरेदीसाठी एक वर्ष विलंब का झाला, याचा खुलासा करण्याची मागणी केली. अधिकाºयांसाठी एका महिन्यात गाड्या खरेदी करण्याची तत्परता दाखविणाºया प्रशासनाला नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व गरजेच्या पुष्पक गाड्या खरेदीसाठी वेळ नाही, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तरतूद असताना पुष्पक गाड्या खरेदीसाठी विरोध का झाला, यांची चौकशी करण्याची व दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर महापौर मुक्ता टिळक यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले.

महापालिकेच्या सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात शहरासाठी तीन पुष्पक वाहने खरेदीसाठी तरतूद करण्यात आली. याबाबत नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी सध्या शहरात केवळ दोनच शव वाहन पुष्पक गाड्या उपलब्ध असून, त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे महापालिकेकडे पुष्पक गाडीसाठी फोन केला तर पाच-सहा तास थांबावे लागेल, असे सांगितले जाते. महापालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स विनावापर पडून असून, याचा पुष्पक वाहन म्हणून उपयोग करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
यावर धीरज घाटे यांनीदेखील प्रशासनाला धारेवर धरले. घाटे यांनी चौदा क्षेत्रीय कार्यालयांना चौदा पुष्पक गाड्या देण्याची आवश्यकता असल्याची गरज असल्याचे सांगितले. खासगी गाड्यांचे चालक अडवणूक करतात, जास्तीचे पैसे मागतात
यामुळे नागरिक महापालिकेच्या पुष्पक गाड्यांवर अंवलबून
राहावे लागते.

Web Title:  On Puneer waiting for 'Pushpak', only two trains have been left to the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे