‘ब्रॅँड पुणे’वर उमटवा खास पुणेरी मोहोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:56 AM2017-12-15T02:56:15+5:302017-12-15T02:56:22+5:30

पुनवडी ते पुणे, शिवशाही, पेशवेशाही, शिंदेशाही आणि लोकमान्यांच्या स्वराज्य स्वप्नाची भूमी अशी ऐतिहासिक बिरुदावली पुण्याच्या शिरपेचात आहेच! राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, वैभवसंपन्न चित्रपटनगरी, नाट्य चळवळीची भूमी...

PUNEHI MOHOR! 'Brand Pune' | ‘ब्रॅँड पुणे’वर उमटवा खास पुणेरी मोहोर!

‘ब्रॅँड पुणे’वर उमटवा खास पुणेरी मोहोर!

Next

पुणे : पुनवडी ते पुणे, शिवशाही, पेशवेशाही, शिंदेशाही आणि लोकमान्यांच्या स्वराज्य स्वप्नाची भूमी अशी ऐतिहासिक बिरुदावली पुण्याच्या शिरपेचात आहेच! राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, वैभवसंपन्न चित्रपटनगरी, नाट्य चळवळीची भूमी... अशी अनेक विशेषणे पुणे आपल्या खांद्यावर खेळवत आहे. पुणेरी टिप्पणी..पेठी भाषा आणि पाटी...ही कायम हशा वसूल करणारी बाब झाली आहे. हा पुण्याच्या ब्रँडचा एक विशेष भाग आहे.
मात्र, पेठांपासून गगनचुंबी झगमगाटापर्यंत विस्तारलेल्या या शहराने आपल्या या विशेषणांमध्ये देखील वाढ केली आहे. त्यामुळेच येथे आता केवळ उत्सवच उत्साहाने साजरे केले जात नाहीत. येथील खाद्यसंस्कृती देखील केवळ बाकरवडी पुरती मर्यादित राहिलेली नाही. येथे असंख्य ठिकाणी खाऊगल्ल्या उभ्या राहिल्यात. कोल्हापुरी, नागपुरी, वºहाडी असोत की बंगाली, दक्षिणी पदार्थ असोत, खास पुणेरीपण घेऊन ते इथलेच झाले. साधी मिसळदेखील विविध पाकसंस्कृतीची भेळ घेऊन आपल्यापुढे हजर आहे. अगदी आपल्या टपरीवर मिळणाºया ‘चहा’वाल्यावरदेखील
‘ब्रँड न्यू’ प्रेम करणारे येथे आहेत. त्यामुळे हा अमुक ब्रँड चाखलाय का किंवा हाच ब्रँड मी घेतो, असे आम्ही अभिमानाने सांगतो.

तुम्हीही सहभागी व्हा
शहराच्या विस्तारलेल्या क्षितिजात पुणेकरांंवर अनेकांनी मोहिनी घातली आहे. म्हणूनच अगदी घरगुती फराळाच्या वस्तूंसाठीदेखील पुणेकर रांगा लावून खरेदी करताना दिसतात. ही बाब केवळ खाद्यपदार्थांपुरती मर्यादित नाही. अगदी स्थानिक ठिकाणी तयार झालेल्या बागा, फिरण्याची ठिकाणे, धार्मिक स्थळे, मनोरंजन आणि क्रीडा संकुले अगदीच झाले तर एखादा रस्तादेखील मॉडेल ठरू शकते. अशी अनेक ठिकाणे शहरात विखुरलेली आहेत.

पुण्यात खपते ते जगात विकते, अशी एक म्हण प्रचलित आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुणेकरांची पसंती ही त्या वस्तूला दिलेली एक वैश्विक दादच म्हटली पाहिजे. येथे एखादी वस्तू वा पदार्थ पसंतीस उतरला, तर तो नक्कीच इतर ठिकाणीदेखील नावाजला जाणार, हीच भावना त्यामागे असते. अशाच पुण्यातील ‘ब्रँड’ला हवी आहे आपल्या पसंतीची मोहोर.

आम्ही चित्रपट महोत्सव आंतरराष्ट्रीय घेतो, मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय घेतो. फोर्जिंग.. आॅटोमोबाईल.. आयटी अशी सेवादेखील आंतरराष्ट्रीय देतो. इतकेच काय, आम्ही संघटनादेखील उभारू त्या अखिल भारतीयच! त्यामुळे पुणे हे आपल्यातच एक ब्रँड आहे. या रसरशीत शहरातदेखील अनेक ‘ब्रँड’ची छोटी-छोटी बेटे दिमाखाने उभी राहिली आहेत. त्यांना पुढे आणण्यासाठी गरज आहे, ती आपल्या खास मताची, खास नजरेची!

लक्ष्मी रस्त्याबरोबरच आम्हाला फॅशन स्ट्रीट असो की जंगली महाराज रस्त्यावरील हाँगकाँग लेन असो, सारखीच खुणावू लागली. तुळशीबाग तर नवरोबांच्या दृष्टीने चेष्टेचाच विषय होतो. त्याचबरोबर फिरण्या-बागडण्यासाठी सारसबाग, कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, पेशवे ऊर्जा उद्यान, पर्वती ही तर आमची हक्काची ठिकाणे आहेतच. तळजाई, हनुमान टेकडी, आगम मंदिर टेकड्या अशी विविध ठिकाणेदेखील आम्हाला ताजेतवाने ठेवू लागलीयत.

आता नाटक-संगीताची भूक भागविण्यासाठी एकटे बालगंधर्व काही पुरत नाही. यशवंतराव चव्हाण, अण्णा भाऊ साठे अशी विविध नाट्यगृहे-कलादालने आम्हाला सातत्याने खुणावत असतात.
ही भूमी केवळ सवाई गंधर्व महोत्सवाची
नाही की केवळ आर्यभूषण थिएटरमध्ये जाऊन
पुन्हा लावण्यांचा फड अनुभवण्याची नाही; आमची दिवाळी पहाटदेखील तितकीच ब्रँड सुरेल असते. कोजागरी पौर्णिमा तितकीच तडकेबाज असते. जलसादेखील जल्लोषाचा असतो. असे कार्यक्रम साजरे करणाºया संस्थांचादेखील एक ब्रँड झाला आहे.

पुणेरी नजरेतून
पुण्याचे ब्रॅँड शोधण्याचा ‘लोकमत’चा मानस आहे. चला तर आपण सगळे मिळून घेऊ ‘ब्रॅँड पुणे’चा शोध. पुण्याची ओळख सांगणारा काय आहे ‘ब्रॅँड पुणे’ आम्हाला १०० ते १५० शब्दांत लिहून पाठवा. ‘लोकमत’मधून निवडक लेखांना प्रसिद्धी मिळेल आणि पुणेकरांच्या मनातील ‘ब्रॅँड पुणे’वर मोहोर उमटेल.
पत्ता : संपादक, लोकमत भवन, व्हीया वेन्टेज, १/२ मजला, सीटीएस ५५/२, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड, पुणे ४११००४
ई-मेल : hellopune@lokmat.com

Web Title: PUNEHI MOHOR! 'Brand Pune'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे