पुणेकरांनी गृहप्रदर्शनाला दिला भरघोस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:10 AM2018-04-10T01:10:45+5:302018-04-10T01:10:45+5:30
लोकमत आयोजित अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घर खरेदीचे स्वप्न साकारण्यासाठी ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१८’ या गृहप्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पुणे : लोकमत आयोजित अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घर खरेदीचे स्वप्न साकारण्यासाठी ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१८’ या गृहप्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला पुण्यातील विविध भागांतील नागरिकांनी व पुण्याबाहेरील, मात्र पुण्यात आपलं घर घेऊ इच्छिणाऱ्या असंख्य नागरिकांनी आवर्जून हजेरी लावली. अक्षय सुखाचे संचित हे स्वप्न साकारण्यासाठी अनेक विविध गृह पर्यायांचा बारकाईने अभ्यास केला.
या प्रदर्शनात अनेक नामांकित गृहप्रकल्प प्रदर्शित झाले होते. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील वन बीएचकेपासून ते बंगलो प्लॉट्सपर्यंतचे विविध पर्याय, नागरिकांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकाच छताखाली पाहता आले.
ज्येष्ठ नागरिकांपासून ते पुण्याला नवी ओळख देणाºया आयटी क्षेत्रातील अनेक नागरिकांनी आपल्याला हवे असलेले, आपल्या मनासारखे व सर्वांत महत्त्वाचे आपल्या बजेटमधील घर पाहायला मिळेल, या उद्देशाने या प्रदर्शनाला हजेरी लावली. अक्षय तृतीयेनिमित्त बांधकाम व्यावसायिकांनी अनेक आकर्षक योजना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणल्या होत्या. त्यामध्ये अत्यल्प डाऊनपेमेंट, पझेशननंतर ईएमआय, मूळ
किमतीवर सवलत, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणारी सूट व जीएसटी कराएवढी सूट अशा विविध योजनांचा यामध्ये सहभाग होता.
रविवारी संध्याकाळी विशेषत: अनेक जण सहकुटुंब या प्रदर्शनाला
भेट देऊन कुटुंबातील सर्वांना अनुरुप अशा घरांची निवड करताना दिसून
येत होते. मध्यवर्ती ठिकाणी व
आगामी सणांच्या मुहूर्तावर ‘लोकमत’ने हे गृहप्रदर्शन आयोजित
केल्याबद्दल अनेकांनी आयोजकांचे आभार मानले.
>वास्तुशास्त्रातील वैज्ञानिक वास्तवाचे महत्त्व
मकरंद सरदेशमुुख हे वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ असून, वैज्ञानिक वास्तवाचे महत्त्व साध्या शब्दांत त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. घरातील अतिशय साध्या व सोप्या बदलातून रोजच्या जगण्यातला आनंद आपण मिळवू शकतो हे वास्तव जीवनातील अनेक घटनांतून समजावून सांगितले. यामुळे वास्तुशास्त्र व त्याबद्दलचे समज-गैरसमज दूर होण्यास मदत झाली. हे मार्गदर्शन सत्र रविवारी (दि. ८ एप्रिल) दुपारी ४ वाजता गणेश कला क्रीडा मंचाच्या आवारात झाल्याने स्वप्नातील घराबरोबर त्यातील महत्त्वपूर्ण अशा वास्तुशास्त्राच्या अनेक बाबींचा विचार एकाच ठिकाणी इच्छुक ग्राहकांना करता आला.
>अक्षय तृतीयेच्यानिमित्ताने याच प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने ग्राहकांचे उत्पन्न विचारात घेऊन तत्त्वत: त्वरित गृहकर्ज मंजुरीपत्र दिल्याने अनेकांचा आनंद द्विगुणीत झाला.