पुणेकरांचे तब्बल ५०० कोटी रुपये वाचणार : काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:25 AM2017-08-04T03:25:05+5:302017-08-04T03:25:05+5:30

वादग्रस्त निविदा रद्द केल्याने पुणेकरांचे ५०० कोटी रुपये वाचणार आहेत, असे भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

 Puneites will be worth 500 crores: Kakade | पुणेकरांचे तब्बल ५०० कोटी रुपये वाचणार : काकडे

पुणेकरांचे तब्बल ५०० कोटी रुपये वाचणार : काकडे

Next

पुणे : वादग्रस्त निविदा रद्द केल्याने पुणेकरांचे ५०० कोटी रुपये वाचणार आहेत, असे भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सांगितले. सल्लागार कंपनी, संबधित अधिकारी यांची यात चौकशी करावी, दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे ते म्हणाले.
१ हजार ८०० कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेची मूळ किंमत निश्चित करतानाच त्यात काम करणाºयाचा १५ टक्के नफा गृहीत धरलेला असतो. तरीही २६ टक्के जादा दराने निविदा आल्या, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्यावर त्यांनी लगेचच या निविदा रद्द करू, असे सांगितले होते, असे काकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महापालिका पदाधिकाºयांची आयुक्त कुणाल कुमार यांना काही सांगण्याची हिंमत झाली नाही. अखेरीस मुख्यमंत्र्यांना यात हस्तक्षेप करावा लागला. महापालिकेच्या आवारात फटाके फोडून त्यांनी निविदा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
ते म्हणाले, ‘अधिकाºयांनी हे जाणीवपूर्वक केले का, हे निविदांच्या संपूर्ण अभ्यासानंतर सांगता येईल. भाजपाचा निविदा प्रक्रियेशी काहीही संबध नव्हता. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशीही चर्चा केली. त्यांनीही निविदा रद्द करा, असेच सांगितले. आता फेरनिविदा तयार होताना गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेकडे पाहूनच पुणेकरांनी भाजपाला मतदान केले आहे, त्यामुळे ही प्रतिमा तशीच ठेवण्याची सर्वच भाजपा पदाधिकाºयांची जबाबदारी आहे. त्यामुळेच या निविदा प्रक्रियेत आपण लक्ष घातले व त्यातून मुख्यमंत्र्यांनी निविदा रद्द केली, असे काकडे म्हणाले.

Web Title:  Puneites will be worth 500 crores: Kakade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.