पुणेकरांनी पावसाळा केला साजरा: सिंहगड, मुळशी हाऊसफुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 05:24 PM2018-06-17T17:24:00+5:302018-06-17T17:24:00+5:30

वीकएंड आणि पाऊस एकत्रित आल्याने पुणेकरांनी रविवार सिंहगड, मुळशी, खडकवासला, पौड आणि लवासा परिसरात घालवल्याचे चित्र बघायला मिळाले.

Punekar celebrates rain, Sinhgad ani Mulshi have full of crowd | पुणेकरांनी पावसाळा केला साजरा: सिंहगड, मुळशी हाऊसफुल 

पुणेकरांनी पावसाळा केला साजरा: सिंहगड, मुळशी हाऊसफुल 

googlenewsNext
ठळक मुद्देपुणेकरांनी लुटला मान्सूनचा आनंद सिंहगड, खडकवासला, मुळशी हाऊसफुल, चहा भज्यांवर पर्यटकांचा ताव 

पुणे :  वीकएंड आणि पाऊस एकत्रित आल्याने पुणेकरांनी रविवार सिंहगड, मुळशी, खडकवासला, पौड आणि लवासा परिसरात घालवल्याचे चित्र बघायला मिळाले. जमिनीवर उतरू पाहणारे ढग आणि सोबत पावसाची रिमझिम यांच्या सानिध्यात अनेकांनी रानवाटा धुंडाळण्यालाही पसंती दिली होती. मान्सूनच्या सुरुवातीला पुणेकरांनी भरपूर उत्साह दाखवला असून तरुणांच्या सोबतीने आबालवृद्धांही पाऊस अनुभवला.   

    शहरात मोठ्या प्रमाणावर असल्यावर असलेल्या आय टी कंपन्यांमुळे अनेकांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी असते. त्यामुळे आयटीयन्स शनिवार रविवार शहरापासून जवळ असणारी पर्यटनस्थळे  हाऊसफुल होत असल्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहेत. त्यातही चारचाकीसोबत बाईक किंवा बुलेटवर भिजत पाऊस एन्जॉय करण्याकडे अनेकांचा ओढा असतो. रविवारी सिंहगड, मुळशी भागातील रस्ते पर्यटकांनी फुलून गेले होते. ज्यांना संपूर्ण दिवस घालवणे शक्य नव्हे अशा पर्यटकांनी संध्याकाळी खडकवासला परिसरात पाऊस अनुभवण्यासाठी दाटी केली होती. रिमझिमत्या पावसात भजी, चहा, मॅगी, कणीस अशा मेनूला प्राधान्य दिले जात होते. याशिवाय रस्त्यावर ठिकठिकाणी पिठलं भाकरी, ठेचा, ताक, मटकीची उसळ, वांग्याची भाजी असा ग्रामीण मेन्यूलाही मागणी दिसून आली. 

        वर्षभर संपूर्ण पावसाळ्यात होतो त्यापेक्षा अधिक व्यवसाय फक्त शनिवार रविवारी होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी स्थानिक विक्रेत्यांनी नोंदवली.पर्यटकांसोबत ट्रेकिंग करणारे संघही सिंहगड परिसरात दिसून आले. वर्षासहलींना प्रारंभ झाला असून दोन दिवस कुटुंबासह मुक्कामी येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली असल्याची प्रतिक्रियाही यावेळी नोंदवण्यात आली. 

Web Title: Punekar celebrates rain, Sinhgad ani Mulshi have full of crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.