पुणेकराने १ हजार किल्ल्यांवरील दगड केले गोळा; तरुणाच्या कर्तृत्वाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 19:33 IST2022-05-13T19:16:20+5:302022-05-13T19:33:00+5:30
पुण्याच्या नितीन भोईटे यांना ट्रेकिंगची अशी काही आवड आहे की त्यांनी थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बनवलाय

पुणेकराने १ हजार किल्ल्यांवरील दगड केले गोळा; तरुणाच्या कर्तृत्वाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
शिवानी खोरगडे
पुणे: पुण्याच्या नितीन भोईटे यांना ट्रेकिंगची अशी काही आवड आहे की त्यांनी थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बनवलाय..! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वानाच बसला. मात्र, या काळात काहींनी नवनवीन प्रयोगही केलेत, तर काहींनी आपले छंद देखील जोपासले. पुण्यातील नितीन भोईटे या तरुणानं देशभरातील एक हजार किल्ले फिरून त्यावरचे वेगवेगळ्या प्रकारचे दगड गोळा केले आहेत. आणि त्याच्या या छंदाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालीये.
नितीन भोईटे यांनी १२ डिसेंबर २०२० पासून किल्ले फिरायला केली सुरवात. तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळे दगड गोळा केले. प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दगड नितीन गोळा करून आपल्यासोबत आणतात. पहिल्या लॉकडाऊनमध्ये नितीन स्प्रेईंगच काम करत होते. ते देशभरातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्प्रेईंग करायचे आणि याचा देखील त्यांना फायदा झाला.
महाराष्ट्र व्यतिरिक्त कर्नाटक, गोवा, राजस्थान, दिव दमन, गुजरात, यूपी, एमपी, हरियाणा अशा दहा राज्यातील किल्ले सर केले आहेत. आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांना संवर्धनाची अत्यंत गरज आहे, असे आवाहनही भोईटे यांनी केले आहे. नितीन भोईटे यांनी किल्ल्यावर गोळा केलेल्या दगडांची नोंद एशिया बुकमध्ये एक रेकॉर्ड आणि इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहे.