पुणेकरांनी अनुभवली कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:52 PM2018-01-29T18:52:22+5:302018-01-29T18:56:09+5:30

सुस्मिता चक्रवर्ती आणि संदीप भट्टाचारीजी यांच्या आश्वासक गायनातून रसिकांनी कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल अनुभवली. गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्टस, मुंबईतर्फे आयोजित मैैफिलीतील समृद्ध गायकीचा आस्वाद पुणेकरांनी घेतला.

Punekar experienced the wonderful concert of young stars of Kolkata | पुणेकरांनी अनुभवली कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल

पुणेकरांनी अनुभवली कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल

Next
ठळक मुद्देगानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्टस, मुंबईतर्फे आयोजनसुस्मिता यांनी सरस्वती वंदना व मीरेचे भजन गात वातावरण केले भक्तीमय

पुणे : सुस्मिता चक्रवर्ती आणि संदीप भट्टाचारीजी यांच्या आश्वासक गायनातून रसिकांनी कोलकाताच्या युवा कलाकारांची बहारदार मैफल अनुभवली. गानवर्धन आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉमिंग आर्ट्स, मुंबईतर्फे आयोजित मैैफिलीतील समृद्ध गायकीचा आस्वाद पुणेकरांनी घेतला. सुस्मिता यांनी सरस्वती वंदना व मीरेचे भजन गात वातावरण भक्तीमय केले. संदीप भट्टाचारीजी यांनी रागस्वरुप उलगडत जाणारी गायकी सादर केली.  
प्रारंभी मुलतानी रागातील ‘देश गये’ ही रचना, तर ‘गगन पुरीला मोरी’ ही बंदिश सादर केली. त्यांनी गायलेल्या सोहनी रागातील ‘बेग बेग मन ललचाय’ या रचनेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मिश्र भैरवीतील ‘होरी खेल न कैसे जाऊ’ या रचनेने मैफलीचा समारोप झाला. अविनाश पाटील (तबला), संदीप मिश्रा (सारंगी), ओजस बसरगेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. याप्रसंगी गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी, कार्याध्यक्ष प्रसाद भडसावळे, प्रमोद जोशी, मा. कृ.  पारधी आदी उपस्थित होते. 
प्रियांका भडसावळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Punekar experienced the wonderful concert of young stars of Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे