...अाणि काही मिनिटांसाठी सावलीने साथ साेडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 02:01 PM2018-05-13T14:01:22+5:302018-05-13T14:01:22+5:30
झीराे शॅडाे डे अर्थात शून्य सावली दिवसाचा अनुभव रविवारी दुपारी 12.31 वाजता पुणेकरांनी घेतला. हा क्षण पाहण्यासाठी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी केसरीवाड्यात गर्दी केली हाेती.
पुणे : दुपारी बाराची वेळ, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी पुण्यातील केसरीवाड्यात गर्दी केली हाेती. कधीही अापली साथ न साेडणारी सावली काहीवेळासाठी सगळ्यांची साथ साेडणार हाेती. अापली सावली नेमकी अापली साथ कशी साेडते हे पाहण्याचे सर्वांमध्ये कुतुहल हाेते. अाणि अखेर ती वेळ अालीच रविवारी दुपारी ठिक 12 वाजून 31 मिनिटांनी पुण्यात सुर्य बराेबर डाेक्यावर अाला अाणि काही मिनिटांसाठी सावलीने अखेर साथ साेडली.
झीराे शॅडाे डाे अर्थात शून्य सावलीचा दिवस साेमवारी पुण्यात अनुभवायला मिळाला. पुण्याच्या ज्याेतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने केसरीवाडा येथे या शून्य सावलीच्या निरिक्षणाचे अायाेजन करण्यात अाले हाेते.यासाठी दुपारी 11 पासूनच लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनीच गर्दी केली हाेती. दुपारी 12.31 वाजता अखेर ताे क्षण अाला ज्याची प्रत्येकजण अातूरतेने वाट पाहत हाेते. काही वेळासाठी प्रत्येकाची सावली बराेबर त्यांच्या पायाखाली अाली हाेती. अनेकांनी हा क्षण अापल्या कॅमेरामध्ये बंदिस्त केला. लहान मुले भर उन्हात उभे राहून अापली सावली कशी हरवते याचे निरिक्षण करत हाेते. ज्याेतिर्विद्या परिसंस्थेतर्फे येते दुर्बिणीतून साैर डागांचे निरिक्षण करण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था सुद्धा करण्यात अाली हाेती. तसेच हळूहळू सुर्य डाेक्यावर येत असताना सावलीमध्ये हाेणारे बदलही यावेळी टिपण्यात अाले. यावेळी उपस्थित नागरिकांना शून्य सावली दिवसाबद्दल माहिती देण्यात अाली.
उत्तरायण-दक्षिणायनामुळे सुर्य खगाेलिय विषुववृत्ताच्या 23.5 अंश उत्तरेला व दक्षिणेला प्रवास करताे. यामुळे 21 मार्च ते 23 सप्टेंबर दरम्यान ज्यावेळेस सूर्य खगाेलीय विषुववृत्त पार करत असताे, तेव्हा पृथ्वीवरील विषुववृत्तावर स्थानिक वेळेनुसार 12 वाजता सूर्य बराेबर डाेक्यावर म्हणजेच ख-मध्य या बिंदूवर येताे. यानंतर उत्तरेला प्रवास करताना, सूर्य अापल्या शहराच्या अक्षांशाइतक्या अंशावर अाला, की त्या दिवशी अापल्या शहरात सूर्य स्थानिक वेळेनुसार बारा वाजता डाेक्यावर येताे व ताे दिवस अापल्या शहरासाठी झीराे शॅडाे डे असताे. पुण्याचे अक्षांश 18.5 अंश असल्याने सूर्य उत्तरेला प्रवास करताना 13 मे राेजी ख-मध्य बिंदू पार केला व यावेळी स्थानिक वेळेनुसार बारा वाजता म्हणजेत भारतीय प्रमाणवेळेनुसार 12 वाजून 31 मिनिटांनी अापली सावली दिसेनाशी झाली अशी माहिती ज्याेतिर्विद्या परिसंस्थेच्या सिद्धार्थ बिरमल यांनी दिली. 14 मे राेजी सुद्धा दुपारी याच वेळेला पुणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार अाहे.