अाता पुणेकरच म्हणतात 'थॅंक्यू' पाेलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 08:23 PM2018-10-03T20:23:41+5:302018-10-03T20:25:14+5:30
पुणे पाेलिसांनी नागरिकांच्या मदतीसाठी दिलेल्या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर पाेलिसांनी मदत केल्याबद्दल अाभार व्यक्त करणारे अनेक मेसेज येत अाहेत.
पुणे : पाेलीस म्हंटलं की कधी वेळेवर येणार नाहीत, मदत करणार नाहीत, केलीच तर पैसे खातील असे साधारण वर्णन अनेक सिनेमांमध्ये केलेले पाहायला मिळते. अापल्याला अायुष्यात पाेलीस स्टेशनची पायरी चढायला लागू नये अशी प्रार्थना अनेकजण करत असतात. परंतु सिनेमांमधील पाेलिसांचे हे वर्णन पुणे पाेलीस चुकीचे ठरवताना पाहायला मिळत अाहे. कारण सध्या पुणे पाेलिसांनी नागरिकांच्या मदतीसाठी दिलेल्या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर पाेलिसांनी मदत केल्याबद्दल अाभार व्यक्त करणारे अनेक मेसेज येत अाहेत. नागरिक अडचण साेडवल्याबद्दल पाेलिसांचे मनापासून अाभार मानत असून पाेलिसही त्यांच्या मेसेजला उत्तर देत अाहेत.
नागरिकांच्या अडचणी त्यांना लवकरात लवकर मांडता याव्यात तसेच त्यांच्या अडचणींचे निरसण व्हावे या हेतूने पुण्याचे पाेलीस अायुक्त डाॅ. के . व्यंकटेशम यांनी अायुक्त पदाचा पदभार स्वीकारताच नागरिकांसाठी दाेन व्हाॅट्सअॅप नंबर दिले हाेते. त्या नंबरला सध्या चांगला प्रतिसाद मिळाला असून केवळ अडचणीच नाही तर पाेलिसांनी मदत केल्याबद्दल त्यांचे अाभार माननारे 15 ते 20 मेसेजेस राेज येत असल्याची माहिती सहाय्यक पाेलीस अायुक्त दीपक हुंबरे यांनी दिली. त्याचबराेबर 100 क्रमांकावर सुद्धा फाेन करुन नागरिक पाेलिसांचे अााभार व्यक्त करत अाहेत. 100 क्रमांकावर अाभार माननाऱ्या नागरिकांना पुणे पाेलिसांच्या व्हाट्सअॅप क्रमांकावर त्यांचा अभिप्राय नाेंदविण्याचे अावाहन पाेलिसांकडून करण्यात येत अाहे. त्यामुळे एकीकडे साेशल मिडीयाचा वापर चुकीच्या पद्धतीने अनेकांकडून केला जात असताना दुसरीकडे पुणे पाेलिसानी साेशल मिडीयाचा वापर करुन राबविलेला उपक्रम नागरिकांच्या फायद्याचा ठरत असल्याचे चित्र अाहे.
याबाबत माहिती देताना हुंबरे म्हणाले, पाेलिसांना राेज 15 ते 20 अाभार माननारे मेसेजेस येत अाहेत. यात बहुतांश मेसेजेस हे तात्काळ ट्रॅफिक साेडवल्याबद्दल अाभार माननारे, रिक्षात वस्तू राहिली अाणि ती शाेधून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे, लहान मुलांसंदर्भातले प्रश्न साेडविल्याबद्दल थॅंक्यू म्हणणारे मेसेजेस असतात. त्याचबराेबर 100 नंबर वर सुद्धा अाभार माननारे अनेक फाेन येत अाहेत. पाेलिसांच्या माेबाईल व्हॅन या अाता चाैकाचाैकात अाणि महत्त्वाच्या ठिकाणी पेट्राेलिंग करत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाणही कमी झाले अाहे. तसेच ट्रॅफिकची समस्या असाे की इतर अडचणी या व्हॅनमुळे नागरिकांना तात्काळ पाेलिसांपर्यंत पाेहचता येत अाहे. पाेलीस अापल्या मदतीसाठी सदैव तत्पर अाहे हा विश्वास पुणेकरांमध्ये निर्माण हाेत असल्याने नागरिक मनापासून पाेलिसांचे अाभार मानत अाहेत.