साेमवारी सावली पुणेकरांची साथ साेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:12 PM2018-05-12T13:12:21+5:302018-05-12T13:12:21+5:30

साेमवारी पुण्यात शून्य सावली दिवस अनुभवायला मिळणार अाहे. दुपारी बारानंतर हा अनुभव पुणेकरांना घेता येणार अाहे.

punekar will experience zero sahdow day on monday | साेमवारी सावली पुणेकरांची साथ साेडणार

साेमवारी सावली पुणेकरांची साथ साेडणार

googlenewsNext
ठळक मुद्दे14 मे राेजी अनुभवायला मिळणार शून्य सावलीचा दिवस दुपारी बारानंतर सावली साेडणार पुणेकरांची साथ

पुणे : असे म्हंटले जाते की सावली अापली कधीही साथ साेडत नाही. सावली सदैव अापल्यासाेबत असते. परंतु 14 मे राेजी म्हणजेच साेमवारी सदैव अापल्या साेबत असणारी सावली काहीकाळासाठी पुणेकरांची साथ साेडणार अाहे. दुपारी बारानंतर शून्यसावलीचा अनुभव पुणेकरांना घेता येणार अाहे. 
       पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. परंतु या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव असताे. हाच अनुभव साेमवारी पुणेकरांना घेता येणार अाहे. 
      पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितिजावरची जागा बदलत असते. सुमारे २३ डिसेंबर ते २१ जून सूर्याचे उत्तरायण असते तर त्यानंतर दक्षिणायन असते. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञांनी दिली आहे. 
    14 मे राेजी पुणे, दाैंड, अलिबाग येथे हा शून्य सावलीचा अनुभव नागरिकांना घेता येणार अाहे.

Web Title: punekar will experience zero sahdow day on monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.