पुणेकरांची पसंती सार्वजनिक वाहनांनाच अधिक : खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 12:19 PM2019-08-01T12:19:12+5:302019-08-01T12:23:17+5:30
गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे...
पुणे : एकीकडे शहरातील अरुंद रस्ते आणि दुसरीकडे दिवसागणिक वाहनांच्या संख्येत पडत चाललेली भर असे चित्र गेल्या वर्षापर्यंत दिसत होते. मात्र, यावर्षी मार्च २०१९ पर्यंत आरटीओकडे झालेल्या वाहनांच्या नोंदीमध्ये तब्बल २८ हजार ५०० ने घट झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये खासगी वाहनांची संख्या घटली असून सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांकडून खासगी वाहनांपेक्षा कॅब, टॅक्सी अथवा ऑटो रिक्षाने प्रवास करण्याला अधिक पसंती देण्यात येत असल्याचे दिसू लागले आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. २००९ साली १७ लाख ६० हजार ४०२ वाहनांची नोंद झाली होती. तर २०१८ सालापर्यंत वाहनांची संख्या ३६ लाख २७ हजार २८० झाली. यामध्ये वाढ होऊन २०१९ साली ही संख्या ३८ लाख ८८ हजार ६९० वर पोचली आहे. शहरामध्ये वषार्काठी नोंद होणाºया वाहनांची संख्या वाढतच गेली आहे. गेल्या वर्षी २ लाख ८९ हजार ९१० नवीन वाहनांची नोंदणी झाली होती. तर २०१९ मध्ये २ लाख ६१ हजार ४१० इतक्या नवीन वाहनांची नोंद झाली असून नवीन वाहनांच्या नोंदणीमध्ये घट झालेली आहे. पर्यावरण अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे २०१२ पासून २०१९ पर्यंतच्या कालावधीत पहिल्यांदाच नोंदणीमध्ये ही घट झाल्याचे दिसत आहे.
खासगी आणि सार्वजनिक वाहने अशी नोंदणी आरटीओकडे करण्यात येते. खासगी वाहनांमध्ये चालू २०१९ मध्ये १ लाख ७६ हजार ३१४ नवीन दुचाकींची झालेली नोंदणी ही गेल्या वर्षीच्या नोंदणीपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी २ लाख ५ हजार ८०४ दुचाकींची नोंद झाली होती. तर २०१९ मध्ये ४७ हजार ६१७ नवीन मोटारींची नोंदणी झाली असून ही नोंदणी मागील वषीर्पेक्षा जवळपास एक हजारांनी कमी झाली आहे.
====
सार्वजनिक वाहनांची नोंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. चालू वर्षात १ लाख २३ हजार ४६ नवीन सार्वजनिक वाहनांची नोंद झाली आहे. २०१८ मध्ये ही ९९ हजार १९ सार्वजनिक वाहनांची नोंद झाली होती. २०१६ पासून टॅक्सी, कॅब्सची संख्या वाढत चालली आहे. २०१६ साली या वाहनांची संख्या १० हजार ७६ होती. ही संख्या चालू वर्षात ३५ हजार ७६ झाली असून जवळपास साडेतीन पटींनी ही वाढ झाली आहे.
====
आरटीओने २०१७ पासून रिक्षा परमीट खुले केल्याने रिक्षांच्या संख्येमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. २०१७ सालात एकूण रिक्षांची संख्या ४५ हजार ४ होती. तर २०१८ मध्ये ५३ हजार २२७ इतकी होती. चालू वर्षात ही संख्या ६९ हजार २७१ वर गेली आहे.