पुणेकरांची १० दिवसांत होणार वाहतूक कोंडीतून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 08:27 PM2018-10-10T20:27:45+5:302018-10-10T20:49:46+5:30

वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अन्य गोष्टींमुळे होणा-या वाहतूक कोंडी होणारे शंभर ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.

Punekars get relief in 10 days from traffic jam | पुणेकरांची १० दिवसांत होणार वाहतूक कोंडीतून सुटका

पुणेकरांची १० दिवसांत होणार वाहतूक कोंडीतून सुटका

ठळक मुद्देपोलीस, महापालिका एकत्र : शहरातील  शंभर ठिकाणावर धडक कारवाईस्वतंत्र दहा पथकांची नियुक्ती, तब्बल २५ क्रेन उपलब्ध

पुणे: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी आता महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि अन्य गोष्टींमुळे होणा-या वाहतूक कोंडी होणारे शंभर ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी येत्या शुक्रवार पासून एकाच वेळी धडक कारवाई करून रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत. 
    गेल्या काही वर्षांत शहरात वाढलेल्या वाहनाची प्रचंड संख्या आणि त्यात पथारी व्यावसायिक, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत व बेशिस्त पार्किंग यामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. यामुळे होणा-या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचा श्वास गुदमरु लागला आहे. परंतु यावार आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळेच आयुक्त सौरभ राव यांनी पुढाकार घेऊन महापालिका आणि वाहतूक पोलीस, पोलीस यांनी एकत्र येऊन संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेताल आहे. यासाठी गेल्या एक-दीड महिन्यांपासून विविध बैठका घेण्यात आल्या. याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यात पाहणी करून शहरात मोठी वाहतूक कोंडी होणारे तब्बल १०० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी महापालिका, वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांच्या संयुक्त विद्यामान कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र दहा पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, कारवाई तब्बल २५ क्रेन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शुक्रवार पासून ही कारवाई सुरु होणार असून, येत्या दहा दिवसात पुणेकरांना मोकळा श्वास घेता येईल अशी अपेक्षा आहे. 
     शहरातली प्रामुख्याने मध्यवर्ती भागातील रस्ते, पेठामधील चौक तसेच वारंवार कोंडी होणा-या चौकाचा समावेश आहे. या ठिकाणी होणा-या अनधिकृत पार्किंग तसेच अतिक्रमणामुळे कोंडी होऊन सकाळी आणि सायंकाळी त्याचा परिणाम या कोंडीच्या ठिकाणांवर जोडणा-या रस्त्यांवर होतो. परिणामी शहरातील वाहतूकीचा वेग मंदावून जवळपास ४० ते ५० टक्के शहरात एकाच वेळी वाहतूक कोंडी होऊन त्याचा ताण सर्वच यंत्रणांवर येतो ही बाब लक्षात घेऊन ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. 
----------------- 
वाहतूक कोंडीसाठी प्रथमच संयुक्त कारवाई
शहरात होणा-या वाहतूक कोंडीचा पुणेकरांना मोठा फटका बसत आहे. परंतु वाहतूक कोंडी पोलिसांचा विषय, पोलिस महापालिका कारवाई करत नाही असे प्रकार सुरु होते. परंतु आता महापालिका, पोलीस आणि आरटीओ सर्व विभाग एकत्र येऊन संयुक्त काम करत आहेत.यात पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पुढील दोन दिवसात ही संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका केवळ अतिक्रमणे काढते तर पोलीस वाहतूक सुरळीत करतात. परंतु ही कारवाई एकत्र होत नसल्याने त्यांचे परिणाम दिसत नाहीत.  ही बाब लक्षात घेऊन संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे पुढील काही दिवसात शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. 
-सौरभ राव, महापालिका आयुक्त 

Web Title: Punekars get relief in 10 days from traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.