पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज...! जनजागृतीसाठी तरुणाईसोबत वृद्धही उतरले रस्त्यावर

By राजू इनामदार | Published: December 12, 2023 04:38 PM2023-12-12T16:38:45+5:302023-12-12T16:39:21+5:30

बालगंधर्व रंगमंदिर चौकात जनजागृती...

Punekars, horn not ok please...! Old people along with the youth took to the streets to create awareness | पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज...! जनजागृतीसाठी तरुणाईसोबत वृद्धही उतरले रस्त्यावर

पुणेकरांनो, हॉर्न नॉट ओके प्लीज...! जनजागृतीसाठी तरुणाईसोबत वृद्धही उतरले रस्त्यावर

पुणे : ’एक, दोन, तीन, चार, नो हॉर्न बार बार‘..‘ऐका हो ऐका, हॉर्न वाजवू नका... नका वाजवू जोरात हॉर्न... आपली तब्येत राहिल छान,‘ ’हॉर्न नॉट ओके प्लीज...‘  अशा घोषणा देत पुणेकरांनी ’नो हॉंकिंग डे’ अर्थात ‘नो हॉर्न डे’ च्या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिर चौकात जनजागृती केली. ज्येष्ठांसोबतच महाविद्यालयीन तरुण आणि पुणे वाहतूक पोलिसांनी यामध्ये सहभाग घेत, ‘पुणेकरांनो हॉर्न वाजवू नका’ असे सांगण्यासोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले.

लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, पुणे पोलीस (वाहतूक शाखा) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार यांच्या वतीने नो हाँकीग डे अर्थात पुण्यात ‘हॉर्न ठेवा एक दिवस बंद ’ अशी संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुण्यातील विविध ठिकाणी नो हाँकींग डे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव, मॉडर्न महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र झुंजारराव, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, लायन्स क्लब पुणे लोटसचे अध्यक्ष प्रसन्न पाटील, लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक, प्रा. पद्माकर पुंडे, संग्राम खोपडे उपस्थित होते.

मॉडर्न कॉलेजमधील एनएसएसचे विद्यार्थी देखील जनजागृतीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला. त्यात विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. या उपक्रमाचे यंदाचे ५ वे वर्ष आहे.

Web Title: Punekars, horn not ok please...! Old people along with the youth took to the streets to create awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.