पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद

By admin | Published: March 27, 2017 03:14 AM2017-03-27T03:14:49+5:302017-03-27T03:14:49+5:30

लोकमत आयोजित पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१७ ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला

Punekar's huge response | पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद

पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद

Next

 पुणे : लोकमत आयोजित पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१७ ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला पुण्यातील विविध भागांतील नागरिकांनी व पुण्याच्या बाहेरील मात्र पुण्यात आपलं घर घेऊ इच्छिणाऱ्या असंख्य नागरिकांनी आवर्जून हजेरी लावली. प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने व रविवार असल्याने अनेकांची पावले या प्रदर्शनाकडे वळली.
पुण्यासारख्या शांत, सुसंस्कृत व सुरक्षित शहरात आपले घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’तर्फे या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला. या प्रदर्शनात अनेक नामांकित गृहप्रकल्पांचे स्टॉल होते. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील १ बीएचकेपासून ते बंगलो प्लॉट्सपर्यंतचे विविध पर्याय, तसेच विविध गृहप्रकल्पांचे साइट्स नागरिकांना या प्रदर्शनाच्यानिमित्ताने एकाच छताखाली पाहता आले. ज्येष्ठ नागरिकांपासून ते पुण्याला नवी ओळख देणाऱ्या आयटीक्षेत्रातील अनेक नागरिकांनी आपल्याला हवे असलेले, आपल्या मनासारखे व सर्वात महत्त्वाचे आपल्या बजेटमधील घर पाहायला मिळेल, या उद्देशाने या प्रदर्शनाला हजेरी लावली.
(प्रतिनिधी)
 गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेक गृहप्रकल्पांकडून सूट मिळत असल्याने अनेकांनी आपल्या स्वप्नातील घराचे बुकिंगही केले. त्याचबरोबर याच प्रदर्शनात असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्राच्या स्टॉलवर गृहकर्जाबाबत माहिती देण्यात आली.
  प्रदर्शन पाहून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर आपल्याला हव्या असलेल्या आपल्या मनासारख्या घराची माहिती मिळाली याचा आनंद दिसून येत होता.
  प्रदर्शनाला भेट दिलेले जावेद इनामदार म्हणाले, लोकमतने हे प्रदर्शन भरवून गृहप्रकल्पांचे अनेक पर्याय एकाच छताखाली आणले आहेत. त्याचबरोबर स्टॉल्सची उत्तम व सुटसुटीत मांडणी केल्याने शांतपणे माहिती घेता आली. हव्या असलेल्या घराची माहिती मिळाली याचा आनंद आहे.

Web Title: Punekar's huge response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.