पुणेकरांना पाहायला मिळणार दुर्मीळ रेडिओचा खजाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:10+5:302021-02-12T04:11:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जागतिक रेडिओ दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवारी (दि. १३) रेडिओ उत्सव रंगणार आहे. पुण्यातील ...

Punekars will get to see the treasure of rare radio | पुणेकरांना पाहायला मिळणार दुर्मीळ रेडिओचा खजाना

पुणेकरांना पाहायला मिळणार दुर्मीळ रेडिओचा खजाना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जागतिक रेडिओ दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवारी (दि. १३) रेडिओ उत्सव रंगणार आहे. पुण्यातील मराठी विज्ञान परिषद, हौशी रेडिओ परवाना धारक, मुक्तांगण विज्ञान शोधवाटिका केंद्र, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स, पद्मिनी इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल कॉलनीतील मुक्तांगण विज्ञान शोधवाटिकेत हा उत्सव साजरा होणार आहे.

या रेडिओ उत्सवात श्रीपाद कुलकर्णी यांच्याकडील जुन्या रेडिओचे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत सर्वाना पाहता येणार आहे. तसेच दुपारी ३:३० ते ६:३० या वेळेत तज्ज्ञांची व्याख्याने आयोजिली आहेत. रेडिओवर प्रश्नमंजूषा स्पर्धाही या वेळी होणार आहे.

आकाशवाणीच्या 'डीआरएम' या नवीन प्रक्षेपण तंत्राबद्द्ल सहसंचालिका चित्ररेखा कुलकर्णी सादरीकरण करतील. या तंत्राचे प्रदर्शनही भरवले जाणार आहे.

रेडिओ दिवसानिमित्त पुण्यातील हॅम विलास रबडे माहिती देतील. 'रेडिओ : काल, आज व उद्या'वर विश्वास काळे, 'एसडीआर रेडिओची रचना आणि विकास' वर डॉ. विश्वास उडपीकर, 'रेडिओ ऐकणे माझा छंद'वर दिलीप बापट प्रात्यक्षिकांसह बोलणार आहेत, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी दिली.

Web Title: Punekars will get to see the treasure of rare radio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.