भाजपाला पुणेरी पाटीचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 06:46 PM2017-08-06T18:46:44+5:302017-08-06T18:46:49+5:30
पुणेरी पाटयांचा जगभर बोलबाला आहे, अशाच एका पुणेरी पाटीमधून भाजपाला चांगलाच झटका देण्यात आला आहे.
पुणे, दि. 6 : पुणेरी पाटयांचा जगभर बोलबाला आहे, अशाच एका पुणेरी पाटीमधून भाजपाला चांगलाच झटका देण्यात आला आहे. पुणेकर बंधु आणि भगिनींनो, आमचा कुणीही पदाधिकारी बावळट नाही असे फलक शहरात लावण्यात आले आहे. भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी नुकतेच भाजपाच्या महापालिकेतील पदाधिकाºयांना जाहीररित्या बावळट म्हटले होते, यापार्श्वभुमीवर विरोधकांकडून पुणेरी फलकातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.
सोशल मिडीयावर संजय काकडे यांच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. जादा दराने २४ तास समान पाणी पुरवठा योजनेच्या निविदांना महापालिकेकडून मंजूरी देण्यात आली. यामुळे महापालिकेचे कोटयावधी रूपयांचे नुकसान होणार असल्याने विरोधी पक्षांसह भाजपाच्या लोकप्रतिनिधींही या निविदांना आक्षेप घेतला होता. यापार्श्वभुमीवर २४ तास पाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रियाच रदद् करण्यात आली. यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी ही निविदा प्रक्रिया रदद् करण्याचे आदेश दिल्याचे सांगून पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट असल्याचे जळजळीत टिका संजय काकडे यांनी केली होती.
महापालिकेत भाजपाची सत्ता यावी म्हणून मोठा पुढाकार घेतलेल्या संजय काकडे यांनीच पालिकेतल्या पदाधिकाºयांना बावळट म्हटल्याने विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. निलायम टॉकिज व पेठेतील विविध चौकांमध्ये ह्यआमचे पदाधिकारी बावळट नाहीतह्ण असे फलक लावण्यात आले आहेत. अज्ञात व्यक्तींकडून हे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांची शहरात दिवसभर चर्चा रंगली होती. संजय काकडे यांच्या टिकेमुळे नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे फलक लावले असावेत असाही अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
शहराच्या विविध मुददयांवर असे बोचरी टिप्पणी करणारे निनावी फलक लावण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घडत आहेत. नोटाबंदी, महापौर व पालकमंत्र्यांचे परदेश दौरे याबाबतही अशाच पाटया शहरभर लावण्यात आल्या होत्या. काँग्रेस पक्षातील अंतर्गत हेव्यादाव्यांवरही फलक लावण्यात आले होते.