पुणेकरांच्या सेवेला आता पीएमपीची ‘एसी बस’
By Admin | Published: April 4, 2015 05:52 AM2015-04-04T05:52:32+5:302015-04-04T05:52:32+5:30
मेट्रो, मोनोरेलच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना लवकरच एसी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या
राजानंद मोरे, पुणे
मेट्रो, मोनोरेलच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना लवकरच एसी बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात लवकरच दहा एसी बस दाखल होणार आहेत. त्यातील आठ बस लोहगाव विमानतळ ते हिंजवडी व कोथरूड बसस्थानक या मार्गावर धावणार आहेत. तर उर्वरित दोन बस ‘पुणे दर्शन’साठी वापरल्या जाणार आहेत.
मागील काही वर्षांपासून अडखळत सुरू असलेली ‘पीएमपी’ची बससेवा साडे तीन महिन्यांपासून सुधारत आहे. मार्गावरील बसची संख्या, प्रवासी संख्या तसेच उत्पन्नातही वाढ होत आहे. त्यातच ताफ्यात नव्या दहा एसी बस दाखल होत असल्याने पीएमपीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. आतापर्यंतच्या पीएमपीच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएमपीला एसी बस मिळणार आहेत.