पुण्याची आस्मि आणि कर्नाटकाच्या क्रिशला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:10 AM2021-03-21T04:10:53+5:302021-03-21T04:10:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्यातर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए चौदा वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस ...

Pune's Asmi and Karnataka's Krishla won the title | पुण्याची आस्मि आणि कर्नाटकाच्या क्रिशला विजेतेपद

पुण्याची आस्मि आणि कर्नाटकाच्या क्रिशला विजेतेपद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्यातर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए चौदा वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या आस्मि आडकर हिने, तर मुलांच्या गटात कर्नाटकाच्या क्रिश त्यागी या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेच्या एकेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या आस्मिने ओरिसाच्या सोहिनी मोहंतीचा असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दोन तास चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सोहिनीने सुरेख सुरुवात करत आस्मिला फारशी संधी न देता हा सेट जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या आस्मिने जोरदार खेळ केला. सामन्यात ३-३ अशी बरोबरी असताना सातव्या गेममध्ये आस्मिने सोहिनीची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-४ असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये आस्मिने आक्रमक व चपळाईने खेळ करत पाचव्या व सातव्या गेममध्ये सोहिनीची सर्व्हिस भेदली व हा सेट ६-२ असा जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

तेरा वर्षीय आस्मि ही पुण्यात अभिनव विदयालय इंग्लिश मिडीयम शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. याआधी तिने फेब्रुवारीत अहमदाबाद येथे सोळा वर्षाखालील चॅम्पियन सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावले होते. तसेच हरियाणा येथे चौदा वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अस्मिने विजेतेपद मिळवले होते.

मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या क्रिश त्यागी याने तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएसचा पराभव करून विजेतेपद मिळवले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमएसएलटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्पर्धा संचालक मनोज वैद्य, एआयटीए सुपरवायझर सोनल वैद्य आणि वैशाली शेकटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : अंतिम (मुख्य ड्रॉ) फेरी : मुले : क्रिश त्यागी (कर्नाटक) (२) वि.वि. प्रणव रेथीन आरएस (तामिळनाडू) (१)६-४, ७-६(५),

मुली :

आस्मि आडकर, महाराष्ट्र वि.वि. सोहिनी मोहंती, ओरिसा १-६, ६-४, ६-२,

Web Title: Pune's Asmi and Karnataka's Krishla won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.