पुण्यातील कॅफेंमध्ये घडतायेत उद्याचे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 03:05 PM2018-12-10T15:05:30+5:302018-12-10T15:06:39+5:30

पुण्यातील विविध कॅफेजच्या माध्यमातून नवाेदित कलाकारांना एक व्यासपीठ मिळत असून त्यांच्यासाठी एक राेजगाराची संधी देखिल उपलब्ध झाली अाहे.

punes cafes are platform to new artist | पुण्यातील कॅफेंमध्ये घडतायेत उद्याचे कलाकार

पुण्यातील कॅफेंमध्ये घडतायेत उद्याचे कलाकार

पुणे : पुण्यातल्या विविध कॅफेंमधील सध्याचं चित्र पाहिलं तर एखादा कलाकार गिटार वाजवत गाणं सादर करताेय किंवा एखादा स्टॅण्डअप काॅमेडियन विनाेदाने वातावरण उत्साही करत असल्याचे पाहायला मिळते. विविध कॅफेजच्या माध्यमातून नवाेदित कलाकारांना एक व्यासपीठ मिळत असून त्यांच्यासाठी एक राेजगाराची संधी देखील उपलब्ध झाली अाहे. 

    सध्या अाॅनलाईनचे जग असल्याने सगळ्या गाेष्टी अाॅनलाईन मिळतात. अनेकजण युट्यूब व फेसबुकच्या माध्यमातून अापल्यातील कला सादर करत असतात. भारतात त्यातही पुण्यात तरुणाईची संख्या अधिक असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये कॅफेजची संख्या वाढली अाहे. त्यातही विविध थिम कॅफेची क्रेझ सध्या तरुणाईमध्ये दिसून येत अाहे. या कॅफेजमध्ये नवाेदित कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी देण्यात येत अाहे. या कलाकारांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे अनेक तरुण अापली कला जाेपासण्यासाठी या कॅफेंमध्ये सादरीकरण करत असतात. या कॅफेंना एक युराेपियन कल्चरचा फिल देण्यात अाला अाहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुण याकडे अाकर्षित हाेत अाहेत. 

    पुण्यातील बाणेर, बालेवाडी, डेक्कन, काेथरुड, अाैंध, विमाननगर अादी भागांमध्ये थिम कॅफे पाहायला मिळतात. शनिवार ,रविवार या कॅफेंमध्ये स्टॅण्डअप काॅमेडीचे कार्यक्रम देखिल अायाेजित केले जातात. विनाेदांच्या माध्यमातून नागरी समस्या तसेच सराकरवरही हलक्या फुलक्या अंदाजात टीका केली जाते. विकेंडला चित्रपट, नाटक पाहण्यासाठी जाणाऱ्यांना हे कार्यक्रम एक पर्याय म्हणून समाेर येत अाहेत. 

Web Title: punes cafes are platform to new artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.