पुण्याच्या सांस्कृतिक बदलाचा दूत ‘ पथिक ’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:48 PM2019-04-16T12:48:54+5:302019-04-16T12:49:11+5:30

पथिक ला या किंवा पथिक मध्ये गेलो होतो हे सांगणे साध्या कार्यकत्यार्पासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांना आनंददायी वाटायचे.

Pune's cultural reformer 'Pathik' | पुण्याच्या सांस्कृतिक बदलाचा दूत ‘ पथिक ’ 

पुण्याच्या सांस्कृतिक बदलाचा दूत ‘ पथिक ’ 

Next

राजकीय वास्तू

पथिक म्हणजे चालणारा. पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वाटचालीत सतत सहयोग देत डेक्कन वरील पथिक हॉटेलने हे नाव सार्थ केले आहे. एक साधे हॉटेल पण ते कसे एखाद्या शहरातील विविध चळवळींचे केंद्र होते याचे हे हॉटेल म्हणजे उत्तम उदाहरण आहे. पथिक ला या किंवा पथिक मध्ये गेलो होतो हे सांगणे साध्या कार्यकत्यार्पासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांना आनंददायी वाटायचे.
-----------------------------
पुण्याच्या गणेशोत्सवाचा चेहराच काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांनी बदलून टाकला. नृत्य, संगीत याप्रकारच्या जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी अवघ्या एकदोन वर्षातच उत्सवाचा ह्यफेस्टिवलह्ण कसा केला ते पुणेकरांना कळलेही नाही. या फेस्टिवलचे आॅफिस होते डेक्कन वरच्या ह्यपथिकह्णमध्ये. त्याचे मालक कृष्णकांत कुदळे हे कलमाडी यांचे मित्र. कुदळे स्वत: कलाप्रिय. तसेच राजकारणीही. त्यातूनच त्यांनी हॉटेलची एक बाजू फेस्टिवलचे आॅफिस म्हणून वापरण्यास परवानगी दिली. त्यामुळे पुण्याच्याच नव्हे तर राज्याच्या व देशाच्याही सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांचा राबता पथिकमध्ये सुरू झाला. म्हणजे डॉ. सतीश देसाई, मोहन जोशी, अभय छाजेड, आबा बागूल असे पदाधिकारी, कार्यकर्ते असायचेच, पण मोहन वाघांसारखे दर्दी रसिकही पुण्यात आले की पथिक मध्येच उतरायचे गणेशोत्सवाच्या आधी साधारण महिनाभर पथिक मध्ये धांदल उडायची ते थेट फेस्टिवल संपल्यावरच थांबायची.
मग सुरू झाली मॅरेथॉन. त्याचेही आॅफिस कम प्रसिद्धी कार्यालय पथिकमध्येच. त्यामुळे क्रिडाक्षेत्रातील अनेकांचे ते विश्रांतीस्थळच झाले. कलमाडी यांच्या उंची उडान ला पंख लावण्याचे काम पथिक करत असे. कुदळे  उर्फ भाऊ यांचा त्यात अर्थातच सक्रिय सहभाग असायचा. संबध मग फक्त उपक्रमापुरतेच रहात नसत. त्यानंतरही ते सुरू रहात. त्यातूनच पुण्याला काही नगरसेवक मिळाले, महापौर मिळाले. वेगवेगळ्या क्षेत्रात लिडरशीप करणारे मिळाले. दरम्यानच्या काळात काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. भाऊ पवार यांच्याबरोबर राहिले. मात्र म्हणून त्यांनी कलमाडी यांच्याबरोबर दुरावा कधीच येऊ दिला नाही. सगळे उपक्रम आहेत तसेच सुरू राहिले. राजकारण वेगळे, सांस्कृतिकीकरण वेगळे हे भाऊंइतके उत्तम कोणालाही समजत नव्हते. त्यामुळेच फेस्टिवल किंवा कलमाडी यांनी सुरू केलेल्या कोणत्याही उपक्रमातील पथिक चा सहभाग कधीच कमी झाला नाही.
पुढे छगन भूजबळ यांनी समता परिषद स्थापन केली. या परिषदेचे तर पथिक हे महाराष्ट्रातील केंद्रच झाले. स्वत: भाऊ भूजबळांचे खंदे समर्थक. त्यामुळे परिषदेचे संघटनकरण्याचे कामकाज स्वाभाविकच त्यांच्याकडे आले. राज्यभरातील अनेकांचे पथिकवर त्यानिमित्ताने येणेजाणे सुरू झाले. महात्मा फुले यांचा वाडा व आसपासचा परिसर समता भूमी अशा नावाने परिचित करण्याचा, तिथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या निर्णयाच्या प्राथमिक बैठका पथिक मध्येच पार पडल्या. पत्रकार, खेळाडू, कलावंत या क्षेत्रात कार्यरत असणाºया देशभरातील व पुण्यातीलही अनेक लहानमोठ्यांचे पथिक  विश्रांतीस्थळ तर झालेच शिवाय उजार्केंद्रही झाले. पथिक परिवार अशा नावाने एक भले मोठे कुटुंबच तयार झाले. आज भाऊ नाहीत. नुकतेच त्यांचे निधन झाले. पथिकसमोरून गेले किंवा पथिकमध्ये गेले तरी त्यांचे स्मरण होतेच. 
(शब्दांकन - राजू इनामदार)

Web Title: Pune's cultural reformer 'Pathik'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.