पुणेकरांची दिवाळी पाण्याविनाच : मुख्यमंत्र्याच्या आश्वासनाची पूर्तता दिवाळीनंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 08:43 PM2018-11-02T20:43:06+5:302018-11-02T20:44:35+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार(दि.१) रोजी पुणे दौ-यामध्ये पुुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करु नये असे आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले.

Pune's Diwali without water: The Chief Minister's assurance is fulfilled after Diwali | पुणेकरांची दिवाळी पाण्याविनाच : मुख्यमंत्र्याच्या आश्वासनाची पूर्तता दिवाळीनंतर

पुणेकरांची दिवाळी पाण्याविनाच : मुख्यमंत्र्याच्या आश्वासनाची पूर्तता दिवाळीनंतर

Next

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार(दि.१) रोजी पुणे दौ-यामध्ये पुुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करु नये असे आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले. परंतु शुक्रवारी सायंकाळ पर्यंत या संदर्भांत कोणत्याची सूचना अथवा लेखी पत्र महापालिका प्रशासनाला मिळाल्या नाहीत. यामुळे सध्या तरी पुणेकरांची दिवाळी पाण्याविनाच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची जलसंपदा विभागाने अमलंबजावणी केल्यास दिवाळीनंतर शहराचा पाणी पुरवठा पुर्ववंत होईल, अशी अशा आहे. 

             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार (दि.१) रोजी पुण्याच्या प्रश्नासंदर्भात महापालिकेतील पदाधिका-यांबरोबर चर्चा केली. यावेळी पुणे शहरातील गंभीर बनलेल्या पाणीपुरवठ्यासंदर्भात पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. पुणे शहराची लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहराला वाढीव पाणी मिळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या सचिवांना शहराच्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात न करता दररोज पूर्वी प्रामाणेच १३५० एमएलडी पाणी देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक उपस्थित होते. परंतु याबाबतचे अधिकृतपत्र अद्याप महापालिका प्रशासनाला मिळाले नाही.

            जलसंपदा विभागाकडून सध्या पुणे शहराला केवळ ११५० एमएलडीच पाणी देण्यात येत आहे. यामुळे  महापालिका प्रशासनाने आता शहरामध्ये एकवेळ पाच तास पाणी देण्याचे नियोजन केले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर १३५० एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे  वेळापत्रक बदलाची वेळ आल्यास यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दिवाळी पुर्वी वेळापत्रकात बदल होणार नाही. आता दिवाळीच्या महापालिकेला सुट्या असल्यामुळे नवीन बदल करणे शक्य नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Pune's Diwali without water: The Chief Minister's assurance is fulfilled after Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.