पुण्यात देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाऊनशिप : विक्रम कुमार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 07:26 PM2019-09-19T19:26:15+5:302019-09-19T19:27:09+5:30

पीएमआरडीएच्या क्षेत्रात पुढील दीड वर्षांत अशा विविध टाऊनशिप प्रकल्पांच्या अंतर्गत सुमारे १०० कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे....

Pune's First Carbon Neutral Smart Sustainable Township: Vikram Kumar | पुण्यात देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाऊनशिप : विक्रम कुमार 

पुण्यात देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाऊनशिप : विक्रम कुमार 

Next
ठळक मुद्देपीएमआरडीए आणि स्वित्झरलँड सरकार एकत्र साकारणार 

पुणे : पुणे जिल्ह्यात भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन व पीएमआरडीए यांच्या सहकार्यामधून पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, स्मार्ट, शाश्वत टाऊनशिपाची उभारणी करणार आहे. त्याबाबतचा करार आज करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
स्वित्झरलँडचे भारतातील कॉन्सूल जनरल ओथमार हारदेगार, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन मुख्य कार्यकारी अधिकारी माधव भागवत यांनी एका कार्यक्रमात या सामंजस्य करारावर सह्या केल्या. याप्रसंगी स्वित्झरलँडचे भारतातील कॉन्सूल जनरल ओथमार हारदेगार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कविता द्विवेदी, मुख्य अभियंते विवेक खरवडकर, २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशनचे स्थानिक भागीदार निखील दिक्षीत उपस्थित होते.
विक्रम कुमार म्हणाले, जागतिक स्तरावर भारताला उदयोन्मुख विकास केंद्र बनविण्याच्या दृष्टीने पीएमआरडीए विभागात कार्बन न्यूट्रल असलेली, स्मार्ट, शाश्वत व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य टाऊनशिप विकसित व्हाव्यात या दृष्टीने आम्ही सकारात्मक पाऊले उचलत आहोत. स्वित्झरलँड सरकार यासाठी आम्हाला मदत करीत आहे. त्याद्वारे सर्व्हिस इंडस्ट्री क्लस्टर, अ‍ॅग्रीकल्चर क्लस्टर व टुरिझम क्लस्टर अशा संकल्पनेवर एकूण १२ टाऊनशिप उभारण्याचा आमचा मानस आहे. जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून केलेल्या सीओपी २१ पॅरिस कराराने निश्चित केलेल्या उद्दिष्टांनुसार नियामक आराखड्याचा अवलंब करीत स्वित्झरलँड सरकार या आधीपासून कार्यरत आहे.
२००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशनच्या सहकाराने  पीएमआरडीएच्या क्षेत्रात पुढील दीड वर्षांत अशा विविध टाऊनशिप प्रकल्पांच्या अंतर्गत सुमारे १०० कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. याबरोबरच स्थानिकांना शाश्वत विकासाच्या दृष्टीने कार्बन न्यूट्रल असणारी, स्मार्ट टाऊनशिप देण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी माधव भागवत यांनी सांगितले.
.......................
भारत व स्वित्झरलँड या दोन्ही देशात तब्बल ७१ वर्षांचे मैत्रीपूर्ण सख्य आहे. शाश्वत विकासासंदर्भात स्वित्झरलँड नेहमीच भारताला मदत करण्यासाठी तयार असेल. आमच्याकडे असलेले आधुनिक तंत्रज्ञान, अनुभव या क्षेत्रातील ज्ञान याद्वारे आम्ही भारताला पूर्ण सहकार्य करू. २००० व्हॅट स्मार्ट सिटी असोसिएशन अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने भारताने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. - ओथमार हारदेगार, स्वित्झरलँडचे भारतातील कॉन्सूल जनरल


 

Web Title: Pune's First Carbon Neutral Smart Sustainable Township: Vikram Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.