पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणूकीला दणक्यात सुरुवात
By राजू हिंगे | Published: September 28, 2023 10:52 AM2023-09-28T10:52:03+5:302023-09-28T10:53:14+5:30
अनंत चतुदर्शीच्या मुहुर्तावर सकाळी १० वाजता महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली...
पुणे : पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या विर्सजन मिरवणुकीला दणक्यात सुरुवात झाली. अनंत चतुदर्शीच्या मुहुर्तावर सकाळी १० वाजता महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली.
पुणे शहरातील गणेश विर्सजन मिरवणुकीची सुरवात महापौरांच्या हस्ते महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून केली जाते. पण पुणे महापालिकेच्या नगसेवकांची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली आहे. पण पालिकेची निवडणुक ही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०२२च्या गणेश विर्सजन मिरवणुकीची सुरवात आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते झाली होती. आता ही पुणे महापालिकेची निवडणुक झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक आणि उपमहापौर, महापौर नाहीत. त्यामुळे यंदाही गेल्यावर्षीप्रमाणे पुण्याच्या वैभवशाली विर्सजन मिरवणुकीची सुरवात आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून झाली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आयुक्त विक्रम कुमार, माजी महापौर अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, आमदार माधुरी मिसाळ राजेश पांडे, सतीश देसाई, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त रितेश कुमार
आदी उपस्थित होते