हेल्मेटसक्तीला पुणेकरांचा ‘हात’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 02:56 AM2019-01-06T02:56:35+5:302019-01-06T02:56:50+5:30
१ जानेवारी २०१९ पासून हेल्मेटसक्ती सुरू झाली आहे. पुणेकरांनी विरोध केला. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज सहा ते सात हजार हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे.
पुणे : वाहतूक पोलिसांनी शहरात हेल्मेटसक्तीबाबत कठोर कारवाई सुरू केल्याने हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. परंतु, डोक्यात हेल्मेट घालण्याऐवजी गाडीच्या आरशाला लटकवून, पेट्रोलच्या टाकीवर ठेवून तसेच स्वत: हेल्मेट घालण्याऐवजी मागे बसलेल्या जोडीदाराकडे हेल्मेट देवून गाडी चालवणाºया दुचाकीस्वारांची संख्याही कमी नाही.
१ जानेवारी २०१९ पासून हेल्मेटसक्ती सुरू झाली आहे. पुणेकरांनी विरोध केला. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज सहा ते सात हजार हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे. यामुळे रस्त्यावरील स्वस्तातील हेल्मेट विक्री चांगलीच वाढली आहे. पुणेकर जिवासाठी नाही तर सक्तीसाठी हेल्मेट घालत असल्याचे दिसून येत आहे. इच्छा नसतानाही अनेक दुचाकीस्वार हेल्मेटबरोबर घेवून घराबाहेर पडत आहेत. मात्र, पोलिसांकडून कोणत्याही रस्त्यांवर किंवा चौकात कारवाई केली जात असल्याचे दिसून आल्यावरच दुचाकीस्वार हेल्मेट घालत आहेत. हेल्मेट घालून गाडी चालवण्याची सवय नसल्याने किंवा गाडी चालवणे अवघड जात असल्याने जवळ हेल्मेट असूनही अनेक जण हेल्मेट घालत नाहीत, असे चित्र सध्या शहरात आहे.
साधारणपणे सर्वच दुचाकी चालवणारे सर्वसामान्य कुटुंबातील असतात. त्यांना हेल्मेट वापरले नाही म्हणून ५०० रुपये दंडाची रक्कम देणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे दंड टाळण्यासाठीच अनेक जण हेल्मेट बरोबर घेऊन फिरताना दिसतात. चौकातील सीसीटीव्ही कॅमेरात आपले छायाचित्र टिपले जाऊ नये, त्यासाठी गाडी चालवताना हातातच हेल्मेट ठेवून चौक जवळ आल्यावर डोक्यात हेल्मेट घालतात. परंतु, काही नागरिकांकडून डोक्याला इजा होऊ नये, यासाठी प्रामाणिकपणे हेल्मेटचा वापर केला जात आहे.
६000 दुचाकीस्वारांवर कारवाई
हेल्मेट परिधान न करणाºया दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असून शनिवारी दिवसभरात ६ हजार २०४ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.