पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पुण्याची शान : मुक्ता टिळक; संकेतस्थळाचे केले उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:54 PM2017-10-30T12:54:37+5:302017-10-30T13:01:20+5:30
३२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पालिकेच्यावतीने ३५ लाख आणि संयोजन समितीतर्फे ५ लाख अशी एकूण ४० लाख रूपयांची रोख पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती मुक्ता टिळक यांनी दिली.
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पुण्याची शान असून ३२ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगरपालिकेच्यावतीने ३५ लाख आणि संयोजन समितीतर्फे ५ लाख अशी एकूण ४० लाख रूपयांची रोख पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती पुण्याच्या प्रथम नागरिक आणि संयोजन समितीच्या स्वागताध्यक्षा मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अॅड अभय छाजेड, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, आमदार दिप्ती चवधरी, आयोजन समितीचे सचिव प्रल्हाद सावंत, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय दामले उपस्थित होते.
यावेळी मुक्ता टिळक म्हणाल्या पुणे मॅरेथॉन ही भारतातील सर्वात जुनी मॅरेथॉन असून ती पूण्याचे वैभव आहे. पुणे शहरातील सर्व तागरीकांचा सहभाग असलेली ही मॅरेथॉन यावर्षी सर्व पुणेकर आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टच्यावतीने आयोजित केली जाणार आहे. यावेळी मुक्ता टिळक यांनी या यावर्षीच्या स्पर्धेच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या वेबसाईटचे उद्घाटन केले.