पुणेकरांचे नेटवर्क गुल, शहर स्मार्ट होतंय, नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 04:00 AM2018-04-02T04:00:46+5:302018-04-02T04:00:46+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना कॉलड्रॉपचा तसेच फोनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून शहर स्मार्ट होतंय, पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

 Pune's Networks Gul, city is smart, will the network companies ever become smart? | पुणेकरांचे नेटवर्क गुल, शहर स्मार्ट होतंय, नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार?

पुणेकरांचे नेटवर्क गुल, शहर स्मार्ट होतंय, नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार?

Next

पुणे - गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना कॉलड्रॉपचा तसेच फोनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून शहर स्मार्ट होतंय, पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कॉल सुरू असताना अचानक कट होत असल्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. अनेकदा एखाद्याला फोन लावल्यास वेगळाच आवाज ऐकू येत आहे. त्याचबरोबर फोरजी नेटवर्कचा सगळीकडे बोलबाला असताना थ्रीजीवरसुद्धा इंटरनेट व्यवस्थित चालत नाहीय. त्यामुळे पैसे फोरजीचे सुविधा टुजीची अशी परिस्थिती पुणेकरांची झाली आहे. एका क्लृप्तीने लोकांचे जीवन बदलून टाकणाऱ्या एका कंपनीच्या ग्राहकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. प्रत्येक कॉल हा चालू असताना कट होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आमचं नेटवर्क स्ट्राँग आहे, आमचे सर्वात जास्त ग्राहक आहेत. फोरजीमध्ये आम्ही सर्वात पुढे आहोत, अशा मोठ-मोठाल्या जाहिराती करणाºया कंपन्यांचे वास्तव यानिमित्ताने समोर येत आहे.
याविषयी अनुज देशपांडे हा तरुण म्हणाला, की गेल्या अनेक दिवसांपासून कॉलड्रॉपचा अनुभव मला येतोय. कॉल सुरू असताना अनेकदा कॉल अचानक कट होत आहे. त्याचबरोबर फोन ठेवल्यावर काही सेकंदांनी फोन डिस्कनेक्ट होत आहे. नेटवर्कच्याबाबतीतही सारखाच अनुभव आहे. सातत्याने नेटवर्क कमी जास्त होत असल्याने इंटरनेट आणि इतर सोशल माध्यमे वापरताना अनेक अडचणी येत आहेत. मुक्ता लेले म्हणाली, की गेल्या दोन महिन्यांपासून मला हा अनुभव येत आहे. मला फोन करणाºयांना माझा फोन बºयाचदा आऊट आॅफ कव्हरेज दाखवत आहे. फोन लागण्यासही अनेक अडचणी येत आहेत.
नाट्यक्षेत्रात मी काम करत असल्याने अनेक कामांचे फोन केले जातात. मात्र कॉलड्रॉपमुळे बोलणं अर्धवट राहत आहे.

हा अनुभव फक्त पुण्यातच येत आहे

इतर शहरांमध्ये ही समस्या जाणवत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मूळच्या पुण्याच्या असलेल्या काही दिवसांसाठी मुंबईला गेलेल्या केतकी लिमये म्हणाल्या, की मुंबईमध्ये असताना एकदाही कॉलड्रॉप झाला नाही. मात्र पुण्यात सातत्याने हा त्रास होत आहे. नोकरीमुळे दररोज अनेक लोकांशी संपर्कात राहावे लागते. परंतु कॉलड्रॉपमुळे संवाद सातत्याने खंडित होत असून मनस्ताप वाढत आहे. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारताना कॉलड्रॉपसारखी समस्या उद्भवणे यासारखा दुसरा विनोद नाही. ट्रायने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

पुरेसे मोबाईल टॉवर शहरात नसल्याने या समस्या निर्माण होत आहेत. नेटवर्क कंपन्यांनी आपल्या ग्राहकांनुसार टॉवरची उभारणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इमारतीवर टॉवर उभारल्याने रेडिएशनचा त्रास होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नागरिक इमारतींवर टॉवर उभारण्यास परवानगी देत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने नेटवर्क कंपन्यांसाठी टॉवर पॉलिसी तयार करायला हवी. टेकड्यांवर या कंपन्यांना टॉवर उभारण्याची परवानगी द्यायला हवी. जोपर्यंत पुरेसे टॉवर उभारण्यात येणार नाहीत तोपर्यंत ही समस्या कायम राहील.
- दीपक शिकारपूर
(आयटीतज्ज्ञ)

Web Title:  Pune's Networks Gul, city is smart, will the network companies ever become smart?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे