पुण्याचे नवे आरडीसी हिम्मत खराडे, तर हवेली प्रांत संजय आसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:10 AM2021-09-19T04:10:26+5:302021-09-19T04:10:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी (आरडीसी) हिम्मत खराडे, तर हवेली उपविभागीय अधिकारीपदी(प्रांत) संजय आसवले यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी (आरडीसी) हिम्मत खराडे, तर हवेली उपविभागीय अधिकारीपदी(प्रांत) संजय आसवले यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. या दोघांसह पुणे विभागातील सोळा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महसूल विभागाने काढले.
सध्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांची अंधेरी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली. आसवले यांची हवेली उपविभागीय अधिकारी या रिक्त पदावर नियुक्ती झाली. सचिन बारावकर यांच्या बदलीने हे पद झाले रिक्त होते. पंढरपूरच्या उपविभागीय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांची नियुक्ती झाली. सचिन ढोले यांच्या बदलीमुळे हे पदही रिक्त होते. गुरव यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले होते. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांची निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा येथे बदली केली आहे. कोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी शंकरराव जाधव यांची नियुक्ती केली आहे.
--------
अधिकारी बदली तपशील (नाव, सध्याचे पद, नवीन पद याक्रमानुसार) - हिम्मत खराडे, नोंदणी उपमहानिरीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे
- संजय आसवले, भूसंपादन अधिकारी, सातारा, उपविभागीय अधिकारी, हवेली.
- गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी, सोलापूर, उपविभागीय अधिकारी, पंढरपूर.
- भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, पुणे.
- जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे मुद्रांक जिल्हाधिकारी, अंधेरी.
- शंकरराव जाधव, उपजिल्हाधिकारी, सांगली निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर.
- प्रशांत आवटे, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, महसूल, सातारा.
- किरण मुसळे-कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना , उपजिल्हाधिकारी भूसंपादन, सांगली.
- वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली, उपविभागीय अधिकारी, भुदरगड.
- अप्पासाहेब समिंदर, अन्नधान्य वितरण अधिकारी उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा.
- उदयसिंह भोसले, उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, उस्मानाबाद
- विजया यादव, उपजिल्हाधिकारी, सांगली उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी, सातारा.
- मोहिनी चव्हाण, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर. उपजिल्हाधिकारी महसूल, सांगली.
- श्रीरंग तांबे, उपविभागीय अधिकारी, पाटण जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर.
- सुनील गाढे, भूसंपादन अधिकारी, पुणे, उपविभागीय अधिकारी, पाटण.