इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील सार्वजनिक वाहुतक व्यवस्था कमकुवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:18 PM2018-08-20T14:18:31+5:302018-08-20T14:19:51+5:30

शासनाने रस्ते आणि उड्डाणपूलांवर खर्च करण्यापेक्षा सक्षम सार्वजनिक वाहतुकीकरिता खर्च होणे गरजेचे आहे. 

Pune's public travaling system of Compared to other cities is weak | इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील सार्वजनिक वाहुतक व्यवस्था कमकुवत

इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील सार्वजनिक वाहुतक व्यवस्था कमकुवत

googlenewsNext
ठळक मुद्दे पीएमपीची बससेवा सुधारण्यासाठी सुसज्ज बस आगार उभारणे आणि मार्गांचे सुसूत्रीकरणाची गरज

पुणे : देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अनेक पटीने मागे आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, इंदौर, बंगळुरू या शहरांमध्ये वाहतुक व्यवस्थेला शासनासह सर्वांकडूनच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. पीएमपीची बससेवा सुधारण्यासाठी प्राथमिक सोयी सुविधा चांगल्या करणे, सुसज्ज बस आगार उभारणे आणि मार्गांचे सुसूत्रीकरणाची गरज असल्याचे मत वाहतूक तज्ज्ञ प्रसन्न पटवर्धन यांनी व्यक्त केले. 
पीएमपी प्रवासी मंचातर्फे आयोजित ह्यविविध शहरातील प्रवासी केंद्रीत बससेवा व पीएमपीह्ण या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, सतिश चितळे, संजय शितोळे आदी यावेळी उपस्थित होते. सौजन्यशील सेवा दिल्याबद्दल तुषार सस्ते या पीएमपी वाहकाचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सजग व सक्रिय बस प्रवासी म्हणून वैभव कुलकर्णी, निळकंठ मांढरे, विपुल पाटील, रुपेश केसेकर, सु.वा.फडके, विराज देवधर, सतिश सुतार, जयदीप साठे यांना मोफत बस पास देण्यात आले.
पटवर्धन म्हणाले, विविध पयार्यांच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातो. बीआरटी, मेट्रो यांसह विविध सेवांवर पैसे खर्च केले जातात. पण त्याआधी शहराचा भौगोलिक व प्रवासी संख्येच्या दृष्टीने अभ्यास केला जात नाही. शासनाने रस्ते आणि उड्डाणपूलांवर खर्च करण्यापेक्षा सक्षम सार्वजनिक वाहतुकीकरिता खर्च होणे गरजेचे आहे. 
पीएमपी सक्षम करण्यासाठी प्रवाशांनाच प्रशासन व राज्यकर्त्यांशी लढा द्यावा लागणार आहे. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांना कारभार समजेपर्यंत त्यांची बदली होते. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रवासी हिताचे निर्णय होत नाही, असे वेलणकर यांनी नमुद केले. बससेवा सक्षम करण्यासाठीचा लढा विविध माध्यमांतून कायम सुरू ठेवला जाईल, असा निर्धार राठी यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Pune's public travaling system of Compared to other cities is weak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.