पुण्याच्या ऋतुजाला दुहेरी मुकुटाची संधी

By admin | Published: June 10, 2017 02:18 AM2017-06-10T02:18:50+5:302017-06-10T02:18:50+5:30

आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेने सुरू असलेल्या १५ हजार डॉलर खुल्या महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत ऋतुजा भोसले

Pune's Rituzas have the opportunity of double crown | पुण्याच्या ऋतुजाला दुहेरी मुकुटाची संधी

पुण्याच्या ऋतुजाला दुहेरी मुकुटाची संधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेने सुरू असलेल्या १५ हजार डॉलर खुल्या महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत ऋतुजा भोसले, महक जैन या भारतीय खेळाडूंनी शनिवारी आपल्याच देशातील खेळाडूंचे आव्हान संपवून खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीतही अंतिम फेरी गाठली असल्याने पुण्याच्या ऋतुजाला दुहेरी मुकुट पटकावण्याची संधी आहे.
औरंगाबादेतील गारखेडा येथील डिव्हीजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. एकेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या पुण्याच्या ऋतुजाने रम्या नटराजनचा टायब्रेकमध्ये ६-३, ७-६ (६) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. १ तास २८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये ऋतुजाने वर्चस्व राखत ५-१ अशी आघाडी घेतली त्यानंतर रम्याने फोरहँडचे फटके लावत सलग दोन गेम जिंकल्या. पण ऋतुजाने सर्व्हिस राखत हा सेट ६-३ असा जिंकून आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्ये ऋतुजाने वरचढ खेळ करत सामन्यात ३-० अशी आघाडी घेतली. मात्र, रम्याने कमबॅक करत ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ऋतूजाने आक्रमक खेळ करत सातव्या व नवव्या गेममध्ये रम्याची सर्व्हिस रोखली व सामन्यात ६-५ अशी स्थिती निर्माण झाली. रम्याने ऋतुजाची १० व १२व्या गेममधे सर्व्हिस भेदली. त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये६-५ अशी स्थिती असताना ऋतुजाने तीन गुण मिळवत हा सेट ७-६ (६)ने जिंकून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत १६ वर्षीय महक जैनने पाचव्या मानांकित निधी चिलुमुलाचा ६-४, ६-३ असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. १ तास २१ मिनिटे चाललेल्या या सामन्यात महक हिने चतुराईने खेळ करत १०व्या गेममध्ये निधीची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-४ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये महकने बेसलाईनवरून सतत रॅली करत दुसऱ्या व सहाव्या गेममध्ये निधीची सर्व्हिस भेदली व हा सेट ६-३ असा जिंकून विजय मिळवला.
दुहेरीत उपांत्य फेरीत ऋतूजा भोसलेने कणिका वैद्यच्या साथीत मनिषा फोस्टर व अ‍ॅलेक्झँड्रा वॉल्टर्स यांचा ६-१, ६-३ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रांजला येडलापल्ली व जिओक्सी झाओ या जोडीने स्नेहादेवी रेड्डी व रिशीका सुंकारा यांचा ७-५, ६-३ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

Web Title: Pune's Rituzas have the opportunity of double crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.