पुण्याच्या वेदांत दुधाणेचा तिरंदाजीत ‘सुवर्ण चौकार’

By admin | Published: April 26, 2017 04:07 AM2017-04-26T04:07:22+5:302017-04-26T04:07:22+5:30

मुंबई येथे झालेल्या महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत पुण्यात वेदांत संजय दुधाणे याने शानदार कामगिरी करून ४ सुवर्णपदके पटकाविली.

Pune's Vedanta Milk in Archery 'Golden Chowk' | पुण्याच्या वेदांत दुधाणेचा तिरंदाजीत ‘सुवर्ण चौकार’

पुण्याच्या वेदांत दुधाणेचा तिरंदाजीत ‘सुवर्ण चौकार’

Next

पुणे : मुंबई येथे झालेल्या महापौर चषक राष्ट्रीय फिल्ड आर्चरी स्पर्धेत पुण्यात वेदांत संजय दुधाणे याने शानदार कामगिरी करून ४ सुवर्णपदके पटकाविली.
अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. १० वर्षांखालील मुलांच्या गटात वेदांतने रिकर्व्ह प्रकारात सेंटर स्पॉटमध्ये हे यश संपादन केले. या स्पर्धेत हरियाना, गोवा, झारखंड, पंजाब, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील २४७ खेळाडूंनी भाग घेतला होता.
सलग तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत वेदांत दुधाणेने सर्वाधिक गुण कमवित अव्वल स्थान कायम राखले. सलग तीन दिवस २६० पेक्षा अधिक गुणांची कमाई केली. यादरम्यान त्याने सेंटर स्पॉट प्रकारात तीन दिवस चॅम्पियन होण्याचा पराक्रम करून ओव्हरआॅल प्रकारातही सुवर्णपदकाची कमाई केली. मागील वर्षी याच स्पर्धेत त्याने १ सुवर्ण व ३ कांस्य पदके जिंकली होती. तो आर्चर्स अकादमीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणजित चामले, राम शिंदे, सुधीर पाटील व ओंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

Web Title: Pune's Vedanta Milk in Archery 'Golden Chowk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.