Pune Water Supply: पुण्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार

By राजू हिंगे | Published: May 21, 2024 07:40 PM2024-05-21T19:40:25+5:302024-05-21T19:40:39+5:30

संपुर्ण शहराला शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

Pune's water supply will be closed on Friday | Pune Water Supply: पुण्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार

Pune Water Supply: पुण्याचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार

पुणे : पर्वती टाकी परिसर,  वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल. आर.) टाकी परिसर तसेच एस.एन.डी.टी. (एच.एल.आर.) टाकी परिसर व चतु:श्रुंगी टाकी परिसर तसेच लष्कर जलकेंद्र रॉ वॉटर पंपिंग, होळकर जलकेंद्र व चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संपुर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारी (दि. २४) बंद राहणार आहे. संपुर्ण शहराला शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
  
पुणे शहराच्या मध्यवती भागातील पेठासह गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत भागेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहननगर, सुस रोड,गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत  जीएसआर टाकी परिसर ,चतुःश्रृंगी टाकी परीसर ,पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर,जुने वारजे जलकेंद्र भाग,लष्कर जलकेंद्र भाग, नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत  असणा०या भागाचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.

Web Title: Pune's water supply will be closed on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.