पुणेकरांना आता फ्लाईटच्या दाेन तास आधी करावं लागणार 'चेक इन'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 04:02 PM2020-01-20T16:02:47+5:302020-01-20T16:10:42+5:30
वाढीव सुरक्षेच्या कारणास्तव पुणे एअरपाेर्टवर आता प्रवाशांना प्रवासाच्या दाेन तास आधी पाेहचावे लागणार आहे.
पुणे : पुणे विमानतळावर वाढविण्यात आलेल्या सुरक्षेमुळे प्रवाशांना आता फ्लाईटच्या दाेन तास आधी चेक इन करावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांना आता आधीपेक्षा लवकर प्रवासासाठी घरातून निघावे लागणार आहे. याबाबतची माहिती पुणे एअरपाेर्ट ऑथरिटीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
भारतातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी पुणे विमानतळ आहे. दरवर्षी 90 लाखाहून अधिक प्रवासी या विमातळावरुन प्रवास करतात. त्याचबराेबर हे विमानतळ हे वायुदलाचे महत्त्वाचे हवाईतळ आहे. वायुदलाच्या विमानांचे उड्डाण या ठिकाणावरुन हाेत असते. यामुळे पुणे विमानतळावर माेठ्याप्रमाणावर सुरक्षा तैनात असते. गेल्या काही वर्षात या ठिकाणावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत माेठ्याप्रमाणावर वाढ झाली असून विमानांची उड्डाणे देखील वाढली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमानांमधून साेण्याच्या तस्करीचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे या विमानतळाची सुरक्षा व्यवस्था आता वाढविण्यात आली आहे.
TRAVEL ADVISORY: In view of enhanced security measures including additional checks enforced at #PuneAirport we request our passengers to report early (atleast 2 hours in advance) & cooperate with the security agencies. Inconvenience caused is regretted. @AAI_Official
— aaipunairport (@aaipunairport) January 20, 2020
'वाढवलेल्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांनी प्रवासाच्या दाेन तास आधी विमानतळावर यावे 'असे ट्विट पुणे एअरपाेर्ट ऑथरिटीकडून करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना आता फ्लाईटच्या दाेन तास आधी विमानतळावर पाेहचावे लागणार आहे.