Pune Crime | दहशत माजवित खंडणी मागणाऱ्या चौघांना मोक्कानुसार शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:05 AM2023-03-16T10:05:33+5:302023-03-16T10:10:02+5:30
मोक्कासह विविध कलमांनुसार ही शिक्षा सुनावण्यात आली...
पुणे : दहशत माजवत खंडणी वसूल करणाऱ्या चौघांना मोक्का न्यायालयाने सहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी १५ लाख १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. मोक्कासह विविध कलमांनुसार ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अब्दुल गनी खान, अक्षय राजेश नाईक, अक्रम नासीर पठाण आणि अक्षय अंकुश माने असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत खडक येथील एका महिलेने फिर्याद दिली होती. २ जून २०१७ रोजी हा प्रकार घडला होता. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील विजय फरगडे यांनी पाहिले. फिर्यादी याचा चायनीजचा गाडा आहे.
आराेपींनी फिर्यादीला ईदची वर्गणी नावाखाली ३ हजार आणि दरमहा २ हजार खंडणी मागितली. मात्र फिर्यादीने आता पैसे नसून उद्याची मुदत द्या असे सांगितल्यानंतर त्यांच्यावर अक्षय नाईक याने धारदार शस्त्राने वार करण्याची धमकी देत वस्तूची ताेडफाेड केली. यातील काही आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी त्यांच्या टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी टाेळीने अनेक गुन्हे केले आहेत, असे तपासात सिद्ध झाले आहे. दंड न भरल्यास चारही गुन्हेगारांना सहा महिने जादा कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे.