विनामास्क फिरणाऱ्या १३५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:12+5:302021-02-24T04:11:12+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भोर शहरात मास्क लावावे, सुरक्षित अंतर पाळावे म्हणून लोकांना दुकानात हाॅटेल विविध व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्यात ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भोर शहरात मास्क लावावे, सुरक्षित अंतर पाळावे म्हणून लोकांना दुकानात हाॅटेल विविध व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. मात्र तरीही मास्क न लावता लोक फिरत आहेत. यासाठी भोर नगरपलिकेच्या वतीने ४ कर्मचाऱ्यांचे एक पथक असे तीन पथके तयार करून २० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारीपर्यंत १३५ लोकांकडून २०० रु. याप्रमाणे सुमारे २७ हजार रु. दंड वसूल केला आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या सूचनेनुसार दोन दिवसांत भोर शहरातील ५ हजार मालमत्ताधारक असलेल्या २२ हजार नागरिकांची घरोघरी जाऊन थर्मल गण, आॅक्सीमीटरच्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे पाहून अधिक लक्षणे असलेल्या नागरिकांना भोर शहरात फ्लू क्लिनिक उभारून तपासणी केली जाणार आहे. यासाठी एका पथकात तीन कर्मचारी अशा ७५ जणाची २५ टीम तयार करण्यात आल्या असून त्यांच्याकडून भोर शहरातील लोकांचे सर्वेक्षण होणार असल्याचे मुख्यधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले.