शिक्रापूर येथे ४० दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:51+5:302021-04-19T04:08:51+5:30
शिक्रापूर येथे बार १५ दिवसासाठी सील करण्यात आला. शिक्रापूर पोलीस व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई ...
शिक्रापूर येथे बार १५ दिवसासाठी सील करण्यात आला. शिक्रापूर पोलीस व ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, शिवदास खाडे, ब्रम्हा पवार, आंबादास थोरे, संतोष शिंदे, प्रताप कांबळे, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे, कृष्णा सासवडे ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड, सिकंदर शेख ,तुळजा माने ,प्रकाश चव्हाण, प्रसाद वाडेकर ,तलाठी अविनाश जाधव, ग्रामविकास आधिकारी बापू गोरे उपस्थित होते. बंदच्या काळात शासनाचे दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी कोरोना विरोधातील लढाईत मदत करण्याचे आवाहन यावेळी सरपंच रमेश गडदे यांनी केले.दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर देखील कडक कार्यवाही करत समज देऊन दंडात्मक कार्यवाही मोठ्या प्रमाणात शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या परीसारील गावांमध्ये करण्यात आली आहे.
.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना कारवाई करताना शिक्रापूर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन