वानवडीत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:48+5:302021-03-17T04:10:48+5:30

नागरिक व दुकानदार, पथारीवाले यांच्यावर मास्क न वापरल्यामुळे ४४ तसेच सामाजिक अंतर न पाळल्यामुळे १६ अशा एकूण ६६ व्यक्तींवर ...

Punitive action against those who do not follow the rules of corona in the forest | वानवडीत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

वानवडीत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next

नागरिक व दुकानदार, पथारीवाले यांच्यावर मास्क न वापरल्यामुळे ४४ तसेच सामाजिक अंतर न पाळल्यामुळे १६ अशा एकूण ६६ व्यक्तींवर कारवाई करून ६२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय पुणे मनपा सहा. आयुक्त किशोरी शिंदे, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक डी. ए. आवटी तसेच अतिक्रमण विभागाचे निरिक्षक श्याम अवघडे, गणेश तारु, आकाश चिन्ह विभागाचे निरिक्षक उमेश घुले, नागरवस्ती विभागातील अधिकारी पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक प्रदीपकुमार राऊत, सीमा पुजारी, मिलिंद खांदोडे, सुनील घोळवे, राहत कोकणी यांच्या पथकाने कारवाई केली.

--------------------------

फोटो : वानवडी क्षेत्रीय कार्यालयाकडून कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Punitive action against those who do not follow the rules of corona in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.