विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:17 AM2021-03-04T04:17:00+5:302021-03-04T04:17:00+5:30

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच मंगल कार्यालये,हाॅटेल, ढाबे,आठवडेबाजार आदी गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवली जाणार असल्याचे ...

Punitive action against unmasked travelers | विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Next

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच मंगल कार्यालये,हाॅटेल, ढाबे,आठवडेबाजार आदी गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवली जाणार असल्याचे याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

तालुक्यात २१ ग्रामपंचायतींनी १२७ जणांवर कारवाई करत आठवडाभरात ५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.खेड पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार व वाहनचालकांसह नागरिकांवर विनामास्क कारवाईतून ३ लाख ३४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी यापुढे कडक कारवाई होणार आहे. नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Punitive action against unmasked travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.