नारायणगाव पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:11 AM2021-02-25T04:11:21+5:302021-02-25T04:11:21+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपाय व योजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने पुन्हा घरोघरी जाऊन सर्व्हे सुरू केले आहे. तर पोलीस प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू करून १४१ जणांवर तर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या १० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ४५ हजारांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेश, तसेच पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव हिंगे, के. डी. ढमाले, भीमा लोंढे, राजाराम भोगाडे, भास्कर बगाड, संतोष कोकणे, शंकर कोबल, संतोष साळुंके, पोपट मोहरे, श्यामसुंदर जयभाय, मुद्दसर शेख आदींनी केली.
दरम्यान, पहिल्यांदा विनामास्क सापडल्यास ५०० रुपये दंड केला जाणार असून, त्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्यांदा बिनामास्क सापडली, तर १ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.
फोटो - मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर नारायणगाव पोलिसांनी नारायणगाव येथे दंडात्मक कारवाई केली.