भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर जेरीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 02:40 AM2018-08-30T02:40:10+5:302018-08-30T02:40:34+5:30

तब्बल दीड लाखाची संख्या : स्मार्ट सिटीचे नागरिक वैतागले

Punkar Jeris, because of dreaded dogs | भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर जेरीस

भटक्या कुत्र्यांमुळे पुणेकर जेरीस

googlenewsNext

पुणे : पुणे शहर हे देशात राहण्यासाठी सर्वाेत्तम शहर असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. परंतु याच पुण्यात भटक्या कुत्र्यांनी मात्र पुणेकरांना जेरीस आणले आहे. जवळपास दीड लाखाहून अधिक भटकी कुत्री शहरात असून त्यांच्या उच्छादाने पुणेकर पुरते वैतागले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरच्या टॉमी, टायगरपासून कधी सुटका मिळणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली आहे. रात्री उशिरा घरी जाणाऱ्या दुचाकीचालकांच्या मागे ही कुत्री लागत असल्याने अनेक अपघातही झाले आहेत. त्यातच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जुलै २०१८ या कालावधीत एकूण ६ हजार नऊशे ३९ नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून ११ नागरिकांना रेबीजची लागण झाल्याचे समोर आले आहे. भटकी कुत्री शहरातील सर्वच भागामध्ये गटागटाने नागरिकांवर हल्ले करीत असल्याने महिलांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ठिकठिकाणी साचलेल्या कचºयाच्या जवळ ही कुत्री भटकत असतात. एखाद्याच्या हातात एखादी पिशवी असेल किंवा काही सामान असेल, तर कुत्री त्यांच्यावर हल्ला करतात. त्याचबरोबर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाºया नागरिकांनाही या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. जॉगिंग करताना अनेकांच्या मागे ही कुत्री लागत असल्याने नागरिकांना व्यायाम करणेही कठीण झाले आहे. तसेच ही कुत्री रस्त्यावर कुठेही घाण करीत असल्यामुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.
त्यातच काही नागरिकांची पाळीव कुत्री ही रस्त्यावरच घाण करत असल्याने रस्ते अधिकच अस्वच्छ होत आहेत. शहरातील बहुतांश भागातील चित्र सारखेच आहे. या कुत्र्यांपासून सुटका मिळविण्यासाठी नागरिक विविध उपाय करीत आहेत. काहींनी आपल्या घराच्या दारात एका बाटलीमध्ये लाल रंगाचे पाणीसुद्धा ठेवून पाहिले. काही महिन्यांपूर्वी बाणेरमध्ये काही कुत्रीही मृतावस्थेत आढळली होती, अशीच घटना हडपसरमध्येसुद्धा घडली होती. या घटनांचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहेत. प्रशासन या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात कमी पडत असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दिवसाला ६० कुत्र्यांची नसबंदी : गळ्यात बसवणार ट्रॅकिंग कॉलर; स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार

कुत्र्यांच्या नसबंदीसंदर्भात बोलताना महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश वाघ म्हणाले, की सध्या शहरातील दोन ठिकाणी या भटक्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. दिवसाला साधारण ५० ते ६० भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते.
४काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नसबंदी केंद्रे वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच सेंट्रलिंग डॉग कॅचिंग अ‍ॅण्ड रिलिज सिस्टीम
उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. ज्या अंतर्गत कुत्र्यांना लसीकरण
करणाºया संस्थेने एक अ‍ॅप डेव्हलप करावे लागणार आहे.
ज्यात नसबंदी केलेल्या कुत्र्यांची तसेच न केलेल्या कुत्र्यांची माहिती
मिळू शकणार आहे.
४तसेच लसीकरण केलेल्या कुत्र्यांच्या गळ्यात एक कॉलर लावण्यात येणार असून त्यात चीप बसविण्यात येणार आहे. ज्या माध्यमातून त्या कुत्र्यांच्या लसीकरणाबद्दलची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सध्या मनुष्यबळाचा अभाव असला तरी येत्या काळात जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. येत्या काळात अधिक काही लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Web Title: Punkar Jeris, because of dreaded dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.