पुणेकर दरमहा घेतात १ कोटी लिटर मद्याचा घोट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 08:00 AM2019-05-26T08:00:00+5:302019-05-26T08:00:07+5:30

गेल्या दोन महिन्यामध्ये जिल्ह्यात २ कोटी ८ लाख लिटर मद्य विक्री जिल्ह्यात झाली आहे.

Punkar takes 1 crore liters alcohol per month | पुणेकर दरमहा घेतात १ कोटी लिटर मद्याचा घोट 

पुणेकर दरमहा घेतात १ कोटी लिटर मद्याचा घोट 

Next
ठळक मुद्देउन्हाळ्यात मागणीत वाढ : बीअर, विदेशी-देशी मद्याला अधिक पसंती २ लाख ५४ हजार ३०३ लिटर वाईनचा स्वादही पुणेकरांनी चाखल्याचे समोर

पुणे : गेल्या तीन वर्षांत मद्यप्राशनाचे प्रमाण वाढले असून, दरमहा तब्बल १ कोटी लिटर मद्य पुणेकर रिचवित आहेत. गेल्या दोन महिन्यामध्ये जिल्ह्यात २ कोटी ८ लाख लिटर मद्य विक्री जिल्ह्यात झाली आहे. विदेशी मद्य, बीअर, देशी दारु आणि वाईन या चारही प्रकाराच्या मद्यविक्रीत वाढ झाली असून, बीअर आणि विदेशी मद्याचा वाटा यात सर्वाधिक आहे. 
मद्य विक्रीच्या टक्केवारीमध्ये अपवाद वगळता सातत्याने मोठी वाढ दिसून येत आहे. तुम्हाला, पावसाळा आणि हिवाळ्यात मद्य प्राशनाचे प्रमाण वाढत असल्याचे वाटत असल्यास ती चूक ठरेल. पावसाळ्यात ऑगस्ट महिना,  हिवाळ्यात डिसेंबर, जानेवारी आणि उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात तुलनेने मद्य विक्री वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातही उन्हाळ्यामध्ये बीअर विक्रीमध्ये पंधरा ते १७ टक्के आणि विदेशी मद्य विक्रीत २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. या शिवाय मद्याचा वार्षिक खपही सरासरी दहा ते वीस टक्क्यांनी वाढला आहे. प्रवृत्तीने उष्ण असूनही, थंड बीअर बरोबरच देशी-विदेशी मद्य उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर रिचविले जात आहे. 
एप्रिल आणि मे महिन्यात २०१७-१८च्या तुलनेत २०१८-१९ मध्ये देशी मद्याची विक्री तब्बल ३२ ते ४७ टक्क्यांनी वाढली. यंदाही मार्च महिन्यात साडेदहा टक्के आणि एप्रिल महिन्यात २.६ टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली आहे. मार्च २०१८ आणि एप्रिल २०१९ या दोन महिन्यांचा विचार केल्यास देशी मद्याची विक्री ४७ लाख ८१ हजार ८७५ लिटर झाली आहे. तर, याच कालावधीत विदेशी मद्य ५४ लाख ७५ हजार ४३९ आणि बीअरच्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ७९० लिटरचा घोट पुणेकरांनी अवघ्या दोन महिन्यांत घेतला आहे. तसेच, २ लाख ५४ हजार ३०३ लिटर वाईनचा स्वादही पुणेकरांनी चाखल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.  
-------------------------

मद्यविक्री लिटरमध्ये 

साल            देशी        विदेशी        बीअर        वाईन
२०१७-१८        २,३५,६८,९७३    २,९७,६०,९६८    ४,४७,४१,७९९    १,२०,२,६३१
२०१८-१९        २,८३,८१,४२९    ३,३७,६८,१६७    ४,९९,७४,३६६    १४,७९,३९४
२०१९-२० (एप्रिल)    २२,४५,९११    २५,८९,८७४    ५१,९९,९५९    १,००,१३२
-----------------------

बिअर स्ट्रॉंगच हवी
पुणेकरांनी २०१८-१९मध्ये ४ कोटी ९९ लाख ७४ हजार ३६६ लिटर बीअर रिचविली आहे. यात स्ट्रॉंग बीअरचा वाटा ३ कोटी ६७ लाख, ७३ हजार ४५५ लिटर असून, माईल्ड बीअरचे प्रमाण १ कोटी ३२ लाख ९११ लिटर इतके आहे. आत्ताच्या एप्रिल महिन्यातही ५१ लाख ९९ हजार ९५९ लिटर बीअर फस्त केली असून, त्यात स्ट्रॉंग बीअरचा वाटा ३४ लाख ४७ हजार ३२९ लिटर इतका आहे.     
 

Web Title: Punkar takes 1 crore liters alcohol per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.