पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:53+5:302021-01-02T04:09:53+5:30

पुणे : मराठी अस्मितेचे एक सांस्कृतिक केंद्र अशी दिवाळी अंकांच्या शंभराहून अधिक वर्षांच्या परंपरेची ओळख आहे. या वैभवशाली परंपरेला ...

Punya Bhushan Best Diwali Issue Award Scheme | पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार योजना

पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार योजना

Next

पुणे : मराठी अस्मितेचे एक सांस्कृतिक केंद्र अशी दिवाळी अंकांच्या शंभराहून अधिक वर्षांच्या परंपरेची ओळख आहे. या वैभवशाली परंपरेला पुन्हा एकदा दैदिप्यमान स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून उत्तमोत्तम दर्जेदार दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने यावर्षीपासून पुण्यभूषण संस्थेने सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार योजना जाहीर केली आहे. दरवर्षी सर्वोत्तम दिवाळी अंकांना १ लाख रूपये आणि सुवर्णमुद्रांकित प्रशस्तीपत्र असा पुरस्कार दिला जाणार आहे.

पुण्यभूषण फाउंडेशन चे संस्थापक डॉ. सतीश देसाई, तसेच संजय भास्कर जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉ. सतीश देसाई म्हणाले, मराठी वाचन -लेखन संस्कृती पुढे नेण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरु केली जात आहे. या योजनेअंतर्गत दर वर्षी दिवाळी अंकातील उत्तम साहित्यास कथात्म गद्य, ललित/वैचारिक गद्य आणि काव्य असे ३ पुरस्कार (प्रत्येकी रु. ११,००० आणि मानपत्र) देण्यात येतील. या पुरस्कार योजनेला नरेंद्र चपळगावकर, रामदास भटकळ, दिलीप माजगावकर, सदानंद मोरे आणि डॉ. अरुणा ढेरे हे ज्येष्ठ मार्गदर्शन करतील.

संजय भास्कर जोशी म्हणाले, विजेत्या दिवाळी अंकाचे प्रकाशक आणि संपादक भिन्न असतील तर सन्मानपत्र प्रकाशकास दिले जाईल तर एक लाख रुपयांची रक्कम दोघात विभागून दिली जाईल. प्रकाशक आणि संपादक एकच असतील तर अर्थातच सन्मानपत्र आणि रक्कम प्रकाशक-संपादकास देण्यात येईल. कोणत्याही अंकास किंवा लेखकास हा पुरस्कार एकदाच दिला जाईल. पुढील वर्षात माजी विजेत्यांचा सत्कार केला जाईल. जे अंक पुरस्कारासाठी पाठवले जातील त्यांचा विचार प्राधान्याने केला जाईल, पण पुरस्कारासाठी न पाठवलेल्या अंकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य निवड समितीला असेल. हा पुरस्कार समारंभ मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ फेब्रुवारी २०२०ला आयोजित करण्यात येईल. या वर्षीच्या पुरस्कारासाठी आपले दिवाळी अंक दिनांक १५ जानेवारी २०२० पर्यंत पुस्तक पेठ लक्ष्मीछाया, आयडियल कॉलनी, आयडियल ग्राउंड जवळ, पौड रोड, पुणे ४११०३८ या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन यावेळी केले.

Web Title: Punya Bhushan Best Diwali Issue Award Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.